मुंबई : काही माणसं सेलिब्रिटी नसतानाही, त्यांना मिळणारी लोकप्रियता थक्क करणारी असते. त्यातच हल्लीच्या दिवसांमध्ये सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं अशा मंडळींच्या संख्येत दर दिवसागणिक भर पडताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियाच्या या वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असणारं एक नाव म्हणजे, IAS Athar Amir Khan .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला, ज्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये त्यांना पाहून अनेक तरुणींनी त्यांच्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. 


30 वर्षीय IAS Athar Amir Khan अतहर आमिर खान यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते एका कॉफी हाऊसमध्ये कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. 


काळ्या रंगाचा शर्ट, चेहऱ्यावर स्मितहास्य आणि मन जिंकणारा रुबाब असं एकंदर या अधिकाऱ्याचं रुप पाहून त्यांच्यावर भाळणारेही अनेक हे कमेंट सेक्शनमध्ये लक्षात येत आहे. 


अरे, यानं तर मन जिंकलं... माझ्याशी लग्न करशील का? तुम्ही आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहात, अशा असंख्य कमेंट तरुणींनी केल्या. मुख्य म्हणजे सोशल मीडियावरच या अधिकाऱ्याला लग्नाची मागणी घालणाऱ्यांचीही संख्या उल्लेखनीय दिसली. 


IAS टीना डाबी यांच्या लग्नानंतर लगेचच सोशल मीडियावर अतहर आमिर यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. एखादा अधिकारीसुद्धा अभिनेत्याच्या लोकप्रियतेला टक्कर देऊ शकतो हेच यावेळी पाहायला मिळालं. 


कोण आहेत अतहर आमिर खान ? 
UPSC Exam 2015 मध्ये देशभरातून दुसऱ्या स्थानावर असणारे अतहर आमिर खान हे सध्या श्रीनगरमध्ये सेवेत आहेत. श्रीनगर नगर निगमचे कमिश्नर आणि श्रीनगर स्मार्ट सिटी लिमिटेडच्या CEO पदावर ते कार्यरत आहेत. 



इन्स्टाग्रामवर त्यांचे 6 लाखांच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. तर, फेसबुकवर त्यांना दीड लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. कामासोबतच अतहर त्यांच्या देखण्या रुपासाठीही चर्चेत असतात. 


अतहरचं लग्न UPSC टॉपर IAS टीना डाबी  (Tina Dabi) यांच्याशी झालं होतं. पण, हे लग्न जास्त काळ टीकलं नाही. अवघ्या दोन वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा आला. ज्यानंतर हल्लीच डाबी यांनी आयएएस प्रदीप गवांडे यांच्याशी लग्न केलं.