नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आयएएस होणे सगळ्यांना शक्य नसते. पण आज तुम्हाला एका अशा आयएएस बद्दल सांगणार आहोत. जे सध्या एका गाण्यामुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या या आयएएस अधिकाऱ्याचे नाव अभिषेक सिंह आहे. आयएएस अधिकारी एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम करत असल्याचे जेव्हा लोकांना समजले तेव्हा हा व्हि़डिओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. गायक बी प्राक यांनी गायिलेलं 'दिल तोड के' हे गाणं रिलीज झालं त्यावेळी ही माहिती समोर आली. ३ कोटी ४६ लाख लोकांनी आतापर्यंत हे गाणं पाहिलं आहे.


सोशल मीडियावर लोक अभिषेकचे कौतुक करीत आहेत. लोक म्हणतात की, अभिनेत्यांना चित्रपटांमध्ये आय.ए.एस., आय.पी.एस च्या भूमिकेत पाहिले आहे. पण जेव्हा कोणी आय.ए.एस. अभिनय जगात आपले कौशल्य दाखवतो असे फारच कमी पाहिले जाते.


आयएएस अधिकारी अभिषेक सिंह लवकरच नेटफ्लिक्सच्या वेब सीरिज 'दिल्ली क्राइम 2' च्या आगामी सीझनमध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिषेक हे विवाहित असून त्यांची पत्नी देखील आयएएस आहे.