मुंबई : नागरी सेवा परीक्षा किती कठीण असतात हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे फार कमी लोकांना माहिती आहे. साधारणपणे लोकांचा असा समज असतो की, जो विद्यार्थी खूप हुशार असतो किंवा शाळेत टॉपर असतो, तोच या परीक्षेमध्ये पास होऊ शकतो. कारण या परीक्षेत पास होण्यासाठी एकाग्रता आणि खूप साऱ्या अभ्यासाठी गरज असते. परंतु एका IAS अधिकाऱ्याने या सगळ्याला खोट ठरवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय या IAS अधिकाऱ्याने हे दाखवून दिलं आहे की, ही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला लहानपणापासून हुशार असण्याची काहीही गरज नाही. जे लोक शाळेत कमी गुण मिळवतात. ते आपल्यातील इच्छेने आणि मेहनतीने ही परीक्षा पास करु शकतो.


या IAS अधिकाऱ्याने आपल्या 10 वीची मार्कशीट दाखवली. ज्यावरुन तुम्हाला लक्षात येईल की, त्याला नक्की यावरुन काय म्हणायचंय.


बिहारमध्ये राहणारे छत्तीसगड कॅडरचे IAS अधिकारी अवनीश शरण यांच्या बोर्ड परीक्षेची मार्कशीट ट्विटरवर खूप प्रसिद्ध आहेत. ते अनेकदा मनोरंजक ट्विट करत असतात. कधी कधी त्यांचे ट्विट इतरांनाही प्रेरित करतात. अलीकडेच, त्यांनी त्यांची मार्कशीट ट्विट केली, ज्यानंतर लोकांना कळले की, ते शाळेत असताना किती अभ्यास करायचे.


अवनीशने त्याची 10वी ची मार्कशीट सोशल मीडियावर शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याचे मार्क्स स्पष्टपणे दिसत आहेत.


आम्ही तुम्हाला सांगतो की IAS अधिकारी झालेले अवनीश शरण जेव्हा 10 व्या वर्गात होते, तेव्हा ते तिसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाले होते. जर आपण गुणांबद्दल बोललो तर ते खूपच कमी होते.


एखाद्याला वाटत असेल की  IAS अधिकारी झालेले अवनीश शरण आधी पासूनच हुशार असतील, परंतु त्यांची मार्कशिट काही वेगळंच चित्र दाखवत आहे. अविनाश यांना गणितात 100 पैकी 31 गुण मिळाले, हे खूपच कमी आहेत. त्याचबरोबर सामाजिक शास्त्रातही त्यांना खूप कमी मार्कस आहेत. ते फक्त काठावर पास झाले आहेत. परंतु असं असलं तरी, त्यांनी जगातील ही कठीण परीक्षा खूप चांगल्या गुणांनी पास करुन सर्वांसमोर एक उदाहरण ठेवलं आहे.