IAS Success Story: तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची इच्छाशक्ती असेल, तर अगदी वाईट परिस्थिती देखील तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही, असं आपल्याकडे म्हटलं जातं ते अगदी खरं आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने कोणतेही कोचिंग न लावता मेहनतीच्या जोरावर देशातील सर्वात कठीण यूपीएससी
परीक्षा उत्तीर्ण केली. 


दिव्याखाली बसून केला अभ्यास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IAS अधिकारी अंशुमन राज हे बक्सर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहायचे. गावातील नवोदय विद्यालयातून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. रॉकेलच्या दिव्याखाली बसून त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. यानंतर त्यांना बारावीच्या अभ्यासासाठी जेएनव्ही रांची येथे जावे लागले.


सामान्य सुविधांचा अभाव


अंशुमन राज अतिशय साध्या कुटुंबातून आणि पार्श्वभूमीतून आले आहेत. त्यांच्याकडे लहानपणापासून चांगल्या सुविधा मिळाल्या नाहीत. यूपीएससी नागरी सेवा परीक्षाही त्यांनी प्रचंड मेहनतीने उत्तीर्ण केली. यामागे आई-वडिलांचा आशीर्वाद असल्याचे ते सांगतात. 


दोनदा यूपीएससी क्रॅक


कोणतेही कोचिंग न लावता त्यांनी सेल्फ स्टडीवर लक्ष केंद्रीत केले आहे.  यानंतर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या रँकनुसार त्यांना आयआरएस पद देण्यात आले होते. हे पद मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा विचार केला. 


आयएएस बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं


आयएएस अधिकारी बनणे हे त्यांचे खरे उद्दिष्ट होते. यानंतर त्यांनी सलग दोनदा यूपीएससीची परीक्षा दिली पण या दोन्ही प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. मात्र, त्यांनी हार न मानता तयारी सुरूच ठेवली. सन 2019 मध्ये, त्यांनी चौथ्यांदा पुन्हा यूपीएससी नागरी सेवा परीक्षा दिली. कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. एवढंच नव्हे तर त्यांनी ऑल इंडिया 107 वा क्रमांक मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.