मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानल्या जातात. या परीक्षेसाठी अनेक तरुण मुलं अनेक वर्षांपासून तयारी करतात. तरी देखील अनेकांना ही परीक्षा पास करणं कठीण जातं. म्हणूनच अनेक उमेदवार कोचिंग सेंटर्स आणि पुस्तकांचा अवलंब करत असतात, केरळमधील एक असा विद्यार्थी आहे, ज्याने फक्त वायफाय कनेक्शन वापरुन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या तरुणाचं नाव आहे श्रीनाथ.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनाथ हा मूळचा मुन्नारचा रहिवासी आहे, त्याने एर्नाकुलममध्ये कुली म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायला सुरुवात केली. आपल्या कुटुंबाचा एकमेव कमावणारा श्रीनाथ, प्रवाशांच्या बॅगा आणि सामान रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवायचा आणि त्यातूनच पैसे कमवायचा. 


श्रीनाथचं हातावरचं पोट होतं. परंतु तो कधीही मेहनत करण्यासाठी मागे हटायचा नाही. त्याने कौटुंबिक जबाबदारीमुळे कुलीची नोकरी सुरू ठेवली, परंतु त्याला आयुष्यात खुप काही करण्याची इच्छा होती.


अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या असलेल्या एका या तरुण बापाला आपल्या एका वर्षाच्या मुलीच्या भविष्यातील खर्चासाठी मासिक उत्पन्न वाढवण्याची नितांत गरज भासली. आवश्यक शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर, श्रीनाथने आपल्या नोकरीसाठी कठोर परिश्रम केले आणि तो अधिकृत कुली बनला.


त्याने कठोर परिश्रम करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्याच्या कमी उत्पन्नामुळे आपल्या मुलाच्या भविष्याशी तडजोड होऊ नये. त्यामुळे रात्रंदिवस काम करून दिवसाला 400  ते 500 रुपये तो कमवायचा.


परंतु असे असले तरी काही मोठं करण्याचं स्वप्न नेहमीच त्याच्या डोक्यात होतं.  लवकरच त्याने नागरी सेवा परीक्षेत बसण्याचा विचार केला, परंतु आर्थिक अडचणींमुळे त्याला अभ्यासाचे साहित्य विकत घेता आले नाही किंवा क्लासेस लावून शिकणं शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत त्याने स्मार्टफोन हा त्याचा आदर्श मित्र बनला.


जानेवारी 2016 मध्ये सरकारने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय सेवा देऊ केली. श्रीनाथच्या यशाची ही गुरुकिल्ली होती. ज्यामुळे त्याला CSE परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत झाली.


आशावादी मानसिकता आणि समर्पित भावनेने श्रीनाथने रेल्वे स्टेशनवर काम करत असताना ऑनलाइन लेक्चर्स ऐकायला सुरुवात केली. त्याने अभ्यासाचे साहित्य खरेदी करण्यासाठी एक पैसाही खर्च केला नाही आणि त्याला फक्त एक स्मार्टफोन, मेमरी कार्ड, एक जोडी इयरफोन आणि मोफत वायफायची गरज होती.


त्यांच्या मेहनतीने त्यांने केरळ लोकसेवा आयोगाची (KPSC) लेखी परीक्षा उत्तीर्ण केली. या तरुण कुलीला केवळ आपल्या कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण गावाचे भविष्य सुधारायचे होते. त्याला शासनाच्या जमीन महसूल विभागात ग्रामक्षेत्र सहायक म्हणून काम करायचे होते.


भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक उत्तीर्ण होण्यासाठी चार प्रयत्न केले आणि स्वतःवर विश्वास ठेवला आणि तो त्यानं पूर्ण देखील करुन दाखवला.


काही अयशस्वी प्रयत्नांनंतर निराश वाटणाऱ्या, संसाधनांच्या कमतरतेमुळे आपल्या क्षमतेवर विश्वास नसलेल्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्वतःची स्वप्ने यामध्ये अडकलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आज IAS श्रीनाथ एक जिवंत प्रेरणा आहे.