IAS Success Story: अपार कष्ट करत आणि आपल्या वेळेचा सदुपयोग करत शून्यातून पुढे जाणाऱ्या या तरूणानं लाखोंची (Sucess Stories) मनं जिकंली आहेत. सध्या शिक्षणाला खूपच महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे आज गरीब असोत वा श्रीमंत प्रत्येक घरातील मुलं ही शिक्षणाची (Education) कास धरताना दिसत आहेत. तेव्हा आपल्यालाही त्यांचे कर्तृत्व वाचून आणि पाहून एकाच वेळी आश्चर्यचकित आणि प्रेरित झाल्यासारखे वाटते. सध्या या अवलियानं आपल्या मेहनतीचे चीज तर केले आहेच पण त्याचसोबत त्याच्या नातेवाईकांनीही (Family) त्याला भरपूर मदत केल्यानं त्याचे आयएएस (IAS) होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. सध्या या तरूणानं आपल्या मेहनतीची आणि जिद्दीची कथा सगळ्यांसमोर सांगितली आहे. तेव्हा जाणून घेऊया या तरूणाची यशोगाथा, जी ऐकल्यावर तुम्हीही प्रेरित झाल्याशिवाय राहणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2018 साली प्रतापनं आपल्याला आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं आणि तो या परीक्षेसाठी अपार मेहनत करू लागला. तुम्हाला ठाऊकचं असेल की सिव्हिल सर्विसेसचा (Civil Services) अभ्यास करणं आणि त्याच पास होणं काही सोप्पं नाही. त्यामुळे ही परीक्षा पास करणं हे प्रतापसाठीही कठीण होतं. आपल्या प्रयत्नाचं चीज करण्यासाठी त्यानं खूप जीव तोडून अभ्यास केला. परंतु पहिल्या प्रयत्नात त्याला यश आलं नाही. त्यानंतर 2019 साली त्यानं पुन्हा एकदा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्यानं ही परीक्षा दिली परंतु त्याला पुन्हा एकदा यश मिळालं नाही. नंतर मात्र त्यानं 2020 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि तो पास झाला. (IAS Success Story of Bihar Boy Pratap Singh Know full details here)


कुछ पाने के लिए कुछ खोनाही पडता हैं 


बिहारमध्ये राहणारा प्रताप सिंह हा 23 वर्षांचा तरूण 2020 साली आयएएस ऑफिसर झाला आहे. प्रताप सिंहची (Pratap Singh Story) कथा ही खूपच प्रेरणादायी आहे. प्रताप याची कहाणी काही सोप्पी नाही त्याने आयएएस परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी कायम प्रयत्न केले आहेत. त्याचसोबत या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्यानं अनेक अटेप्टंस दिले आहेत. त्यातून हार न मानता तो अभ्यास करत राहिला आणि त्यानं दोन वर्षांपुर्वी या परीक्षेत घसघशीत यश मिळवले आहे. परंतु हा प्रवास इतका सोप्पा नव्हता. यासाठी त्याला अपार कष्ट आणि अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला आहे. त्याच्या संपुर्ण अभ्यासाचा खर्च, त्याची राहायची सोय, परीक्षेसाठी दिल्लीला जाण्यायेण्याचा खर्च, गावात परत येण्याच्या खर्च आणि त्याशिवाय परीक्षेची फीज यांसाठी त्याच्या वडिलांना आपलं घरंही विकावं लागलं आहे. त्यांनी त्यांची वडिलोपार्जित प्रोपर्टीही विकली आहे. 


प्रदीपच्या वडिलांनी आपलं कांमं हे गॅस स्टेशनवर (Gas Station) सुरू केलं होतं आणि ते त्यातचं आत्तापर्यंत काम करत आले आहेत. त्याचा भाऊ हे एका प्रायव्हेट कंपनीत काम करतात. बी.कॉम झाल्यानंतर प्रदीपनं आयएएस बननण्याचा निर्णय घेतला आणि त्यानं त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. त्यातून त्याचं शिक्षण पुर्ण व्हावं म्हणून त्याच्या वडिलांनी आपली सर्व प्रोपर्टी विकली.