Assistant Central Intelligence Officer : देशांतर्गत काम करणारी गुप्तचर यंत्रणा म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोने (Intelligence Bureau) मेगाभरतीची अधिसूचना 21 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी एसीआयओ ग्रेड-II कार्यकारी पदासाठी भरती मोहीम (IB ACIO Recruitment 2023) आयोजित केली गेली आहे. त्यामुळे आता सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यात येणार आहेत. उमेदवारांना mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) अंतर्गत येणाऱ्या या विभागात नोकरी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत.


अर्ज भरण्याची शेवटची तारीख?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

21 नोव्हेंबर 2023 रोजी तब्बल 995  पदांच्या भरतीसाठी अधिसूचना काढण्यात आलीये. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणजेच ACIO ग्रेड-II या पदासाठी ही भरती प्रक्रिया केली जाईल. 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 20223 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज या वृत्तपत्रात देखील जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 ही असेल.


अर्ज कसा करायचा?


सर्वप्रथम mha.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. IB ACIO 2023 भर्तीसाठी उपलब्ध असलेली लिंक दिसेल. तुमची नाव नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. लॉगिन केल्यावर तुमची संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील. त्याचबरोबर फी भरल्यानंतर तुमचा अर्ज जमा होणार आहे. तुमच्या अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्या. 


अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती?


केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II/ एक्झिक्युटिव्ह भर्ती 2023 अंतर्गत भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे अशी असणार आहे. 


परीक्षा फी किती?


अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी/आर्थिक दुर्बल श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 450 रुपये आहे. तर एससी/एसटी आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पद्धतीद्वारे अर्ज करू शकता. भरती प्रक्रियेतून निवड होणाऱ्या उमेदवारांना मूळ वेतन 45 हजार ते 1 लाख 42 हजार रुपये असणार आहे.