ICICI Bank Credit Card: क्रेडिट कार्डची चलती असणाऱ्या या दिवसांमध्ये हल्ली दर दुसऱ्या व्यक्तीकडे या कार्डचा वापर होताना दिसत आहे. विमान प्रवासापासून अगदी एखाद्या महागड्या वस्तूच्या खरेदीपर्यंत या क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. पण, सध्या याच क्रेडिट कार्डमुळं असंख्य कार्डधारकांची खासगी माहिती धोक्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेकडून जवळपास हजारो कार्ड यजर्सची माहिती लीक झाल्याचं सांगत अनेकांना सावध करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेच्या सांगण्यानुसार हल्लीच जारी करण्यात आलेल्या जवळपास 17000 क्रेडिट कार्डची संबंधित माहिती चुकीच्या युजर्सशी जोडण्यात आल्यामुळं हे संकट ओढावलं आहे. बँकेनं यासंदर्भातील माहिती मिळताच तातडीनं त्या 17000 कार्डना ब्लॉक करत सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलली. 


खासगी क्षेत्रातील अग्रगणी बँक म्हणून ओळख असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेनं दिलेल्या माहितीनुसार माहिती लीक झालेल्या कोणत्याही कार्डचा दुरूपयोग झाल्याची कोणतीही घटना किंवा नोंद अद्याप करण्यात आलेली नाही. पण, कार्डधारकांना कोणतंही आर्थिक नुकसान झाल्यास बँकेकडून त्याची भरपाई करण्यात येणार असल्याची हमी देण्यात आली आहे. 


हेसुद्धा वाचा : Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरं कधी मिळणार? म्हाडानं थेटच सांगितलं...


सूत्रांच्या माहितीनुसार बँकेच्या नव्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक काही जुन्या कार्डधारकांच्या माहितीशी जोडण्याचत आला. या गोंधळामुळं बँकेच्या मोबाईल अॅपवर निवडक जुन्या ग्राहकांना नव्या कार्डची संपूर्ण माहिती दिसू लागली होती. सोशल मीडियावरही याबाबतची बरीच चर्चा झाल्यानंतर बँकेनं तातडीनं या प्रकरणात लक्ष घालत महत्त्वाची पावलं उचलली. ICICI Bank च्या प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर अडचणीत सापडेल्या कार्डधारकांचा आकडा 0.1 टक्के असून, त्यावरही बँकेनं तोडगा शोधपलरा आहे, ज्यामुळं ब्लॉक करण्यात आलेल्या क्रमांकाचे कार्ड पुन्हा Issue करण्यात येणार नाहीत.