नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती आणणारी सेवा खासगी बँक आयसीआयसीआय बँकने सुरू केली आहे. बँकेच्या डिजिटल पॉकेटला तुम्ही युपीआय(UPI)द्वारे लिंक करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँक अकाऊंट असण्याची गरज नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे ग्राहक आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक नाहीत. ते देखील युपीआय आयडी मिळवू शकतात. ज्या ग्राहकांकडे आधीच युपीआय आयडी आहे, त्यांना नवा आयडी मिळेल. जेव्हा Pockets ऍपमध्ये लॉग इन करण्यात येईल. आयसीआयसीआय बँक या सुविधेला सुरू करणारी पहिली बँक आहे.
 
 या ऍपच्या माध्यमातून वापरकर्ते युपीआयचा वापर करून दररोजचे किरकोळ व्यवहार करू शकतील. हा अगदी सुरक्षित डिजिटल व्यवहार असेल. त्याचा दुसरा फायदा असा असेल की, तुमच्या बँकेच्या सेविंग अकाऊंटमध्ये किरकोळ व्यवहार स्टेटमेंटमध्ये रेकॉर्ड होणार नाही. हे ऍप कॉलेज स्टुडंट्साठी फायद्याचे मानले जात आहे. ज्यांच्याकडे कोणतेही सेविंग अकाऊंट नसते.


वापर कसा कराल


 नव्या वापरकर्त्यांनी सर्वात आधी Pockets ऍपला डाऊनलोड करावे. वापरकर्त्यांच्या मोबाईल नंबरवर रजिस्टर करून लॉग इन करता येईल. युपीआय आयडी बनवण्यासाठी कोणत्याही बँक अकाऊंटची गरज असणार नाही.


कोणाला पेमेंट करता येईल


आयसीआयसीआय बँकेने युपीआय नेटवर्कला डिजिटल पॉकेट्सशील लिंक करण्यासाठी NPCI सह करार केला आहे. ग्राहक Pockets ऍपच्या माध्यमातून पेमेंट करू शकतात. त्यासाठी त्यांना बँकेचे अकाऊंट वापरण्याची गरज नाही. Pocketsच्या युपीआय आयडीचा वापर व्यक्ती ते व्यक्ती करता येईल तसेच व्यक्ती ते मर्चंट असादेखील करता येईल. वापरकर्त्यांना या पेमेंट्सवर रिवॉर्डसुद्धा मिळतात.