`अल्लाह`सोडून इतर देवांची पूजा करणारा मुस्लिम नाही - दारुल उलूम
दारुल उलूमच्या उलेमांच्या म्हणण्यानुसार, जर कुणी `अल्लाह`शिवाय इतर कोणत्याही ईश्वराची पूजा करत असेल तर तो मुस्लिम राहत नाही... साहजिकच त्यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत.
नवी दिल्ली : दारुल उलूमच्या उलेमांच्या म्हणण्यानुसार, जर कुणी 'अल्लाह'शिवाय इतर कोणत्याही ईश्वराची पूजा करत असेल तर तो मुस्लिम राहत नाही... साहजिकच त्यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत.
नुकतंच, वाराणसीमध्ये एका संस्थेद्वारे दिवाळीच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात नाजनीन अन्सारीसहीत काही मुस्लिम महिलांनी उर्दू रचित श्रीराम आरती आणि हनुमान चालीसेचं पठण केलं होतं... आणि त्याचा फोटोही सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर उलेमांनी हे वक्तव्य केलंय.
उल्लेखनीय म्हणजे, नाजनीन काशीची पहिली महिला आहे जिनं अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाटी ५०१ रुपयांचा निधी दिला होता... इतकंच नाही तर याच मुस्लिम महिला फाऊंडेशनमध्ये पंतप्रधान मोदींनी तीन तलाकच्या मुद्यावर सर्वात अगोदर आपलं समर्थन जाहीर केलं होतं.
यापूर्वी, मुस्लिम महिला आणि पुरुषांनी स्वत:चा किंवा आपल्या कुटुंबियांचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करणं योग्य नाही... कारण इस्लाम यासाठी परवानगी देत नाही, असा फतवाच दारुम उलूम देवबंदनं जाहीर केला होता.
अधिक बातम्या
मुस्लिमांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करू नयेत, 'देवबंद'चा नवा फतवा