नवी दिल्ली : आपण एटीएममध्ये योग्य पिन टाकून प्रक्रीया करतो पण तरीही पैसे बाहेर येत नाही. अशावेळी आपण चांगलेच गोंधळून जातो. पैसे गेल्याचा मेसेज मोबाईलमध्ये इनबॉक्समध्ये येतो तेव्हा तर अधिकच टेन्शन येतं. अशावेळी भीती वाटणे साहजिकच आहे. पण अशावेळी तुम्हाला घाबरुन जाण्याची गरज नाही. तुमचे कापले गेलेले पैसे परत मिळू शकतात. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर योग्य पिन टाकूनही एटीएममधून पैसे आले नाहीत तर ग्राहकाला त्याचे पैसे बॅंकेला परत करावे लागतील असे रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने म्हटलंय. आरबीआयच्या वेबसाईटवर यासंदर्भातील प्रश्न वारंवार विचारला जातो. त्याला उत्तर देऊन अनेकांच्या शंकेचे निरसन करण्यात आलंय. 



बॅंकानी स्वत: च्या अख्त्यारित हा व्यवहार करणं अपेक्षित आहे. 


पैसे कमी आले असतील किंवा आले नसतील आणि एटीएम दुसऱ्या बॅंकेचे असेल तर ग्राहकांनी बॅंकेत तात्काळ तक्रार करणे गरजेचे आहे. 


ट्रान्झाक्शन अयशस्वी झाल्यास ५ दिवसांच्या आत बॅंकेने ते पैसे ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये क्रेडीट करणं गरजेचं आहे. 


बॅंकेने ५ दिवसात पैसे परत न केल्यास दररोज शंभर रुपयाप्रमाणे बॅंकेले पैसे द्यावे लागतील. 


ग्राहक आपल्या बॅंकेशी संपर्क करुन याबद्दल तक्रार करु शकतो. 


बॅंकेला प्रश्न करुनही ३० दिवसांच्या आत उत्तर न मिळाल्यास ग्राहक बॅंकीग लोकपालकडे पुन्हा जाऊ शकतो.