नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा १९ मे रोजी सायंकाळी ४.०० वाजता राज्य विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करायचंय. जर येडियुरप्पा सदनात बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरले तर ते आपलाच जुना 'खराब' रेकॉर्ड तोडण्यापासून दूर राहतील... परंतु, जर ते बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर ते आपलाच एक 'रेकॉर्ड' ब्रेक करतील... यापूर्वी २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते कर्नाटकातील सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले होते. त्यानंतर २००७ मध्ये मोडतोड करत-करत भाजपनं जेडीएससोबत हातमिळवणी केली... परंतु, येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर अवघ्या सात दिवसांच्या आतच जेडीएसनं आपलं समर्थन मागे घेतल्यानं येडियुरप्पांचं सरकार कोसळलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या येडियुरप्पा पुन्हा एकदा फ्लोअर टेस्टमध्ये अयशस्वी ठरले तर ते यंदा सात दिवसांच्याऐवजी अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरतील... आणि आपला जुना रेकॉर्डब्रेक करतील. 


दरम्यान, कर्नाटकात उद्याच म्हणजे शनिवारी दुपारी ४.०० वाजेपर्यंत मुख्यमंत्री बी एस युडियुरुप्पा यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. मात्र, भाजपकडे १०४ आमदार आणि एक अपक्ष आमदार असे १०५ आमदार आहेत. त्यामुळे ११२ चा जादूई आकडा कसा पार करणार याचीच उत्सुकता आहे. त्यामुळे भाजपकडून विरोधकांचे आमदार फोडावे लागणार आहे, हे स्पष्टच आहे. दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार ज्या ठिकाणी एकत्र रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणची सुरक्षा हटविण्याचे आदेश देत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच येडियुरुप्पा यांनी हटविली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही सुरक्षा पुन्हा देण्याचे आदेश दिलेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे येडियुरुप्पा यांना जोरदार दणका बसलाय.