नवी दिल्ली : जनतेला रोजगार पुरवण्याच्या मुद्दयावरुन भाजपा सरकारला विरोधकांनी धारेवर धकले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. जर काँग्रेसचे सरकार बनले तर एका वर्षाच्या आत देशात 22 लाख सरकारी नोकऱ्या निर्माण करु असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. हे आश्वासन पूर्ण करण्याची तारीख देखील राहुल यांनी सांगितली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत सरकारी नोकऱ्यांच्या रिक्त जागा भरल्या जातील असे ते म्हणाले. मोदी सरकारला रोजगाराच्या मुद्द्यावर घेरणाऱ्या राहुल यांनी लोकसभा निवडणुकीच्या दहा दिवस आधी हे आश्वासन दिले आहे. जे खूप महत्त्वपूर्ण मानले जात आहे. राहुल यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यानुसार सध्या 22 लाख सरकारी पदे रिक्त असून 31 मार्च 2020 पर्यंत या सर्व जागा भरल्या जातील असे ते म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



दलित, आदिवासी आणि ब रस्त्यावर आणून मारण्यात आले. कित्येकांना जीवे मारण्यात आले. ते यांनी दररोज घाबरवत आहेत. भाजपा आणि आरएसएस संविधानावर हल्ला करत आहेत. लोकशाहीच्या संस्थानाची विश्वासआर्हता कमी होत चालली आहे असा आरोप राहुल यांनी अनंतपूर आणि कल्याणदुर्ग येथील प्रचार सभेत केला. सध्याची वेळ ही देशासाठी घातक असून अशाने लोकशाही वाचणार नाही. ते आपले स्वप्न पूर्ण करताना लोकशाहीचा गळा घोटत आहेत. कायदा हातात घेत आहेत. कोणालाही जीवे मारण्याची सूट देत आहेत. तात्काळ कोणता विद्रोह होऊ नये म्हणून लोकशाहीच्या विरोधात ते हळूहळू पाऊल टाकत असल्याचेही राहुल यांनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूक प्रचार करत आहेत. प्रत्येक मोर्चावर ते केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत. शिक्षण, आरोग्य, जोरगार अशा मुद्द्यावर ते सरकारला घेरत आहेत.