अलवर : राजस्थानचे कॅबिनेट मंत्री जसवंत यादव यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्माच्या आधारावर मतं देण्यासाठी या व्हिडिओत यादव लोकांना आवाहन करताना दिसत आहेत. अलवर लोकसभा उपनिवडणुकीत भाजपच्या तिकीटावर जसवंत यादव उभे आहेत. 


'हिंदू असाल तर भाजपला मत द्या, मुस्लिम असाल तर काँग्रेसला' असं म्हणत धार्मिक आधारावर मतदानाचं आवाहन त्यांनी केलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 


'मेवातमध्ये निवडणुकीदरम्यान मुस्लिमांनी मला म्हटलं की मी केलेल्या विकास कार्यासाठी मला मतदान करणार... पण भाजपला मतदान करणार नाही कारण तो हिंदूंचा पक्ष आहे. जर तुम्ही हिंदू असाल तर मला मत द्या आणि जर मुस्लिम असाल तर काँग्रेसला मत द्या' असं म्हणताना या व्हिडिओत जसवंत यादव म्हणताना दिसत आहे. 


ही अंगाशी येतेय म्हटल्यानंतर मात्र, जसवंत यादव यांनी ही काँग्रेसची खेळी असून या व्हिडिओची छेडछाड करण्यात आल्याचं म्हटलंय.