तिरुवअनंतपूरम : काँग्रेस सत्तेत आल्यास केंद्रात नवं मत्स्यपालन मंत्रालय सुरू करण्यात येईल, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलंय. पूरग्रस्त केरळ राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या गांधी यांनी पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या अलापुझा जिल्ह्यात पुनर्वसन छावण्यांना भेट दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच पूरस्थिती असताना अनेकांचे जीव वाचवणाऱ्या मच्छिमारांचा राहुल यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. तटरक्षक दलानं भविष्यात आपत्कालिन स्थितीत बचावकार्यात मच्छिमारांची मदत  घेण्याबाबत विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. 


केवळ ३ हजार मच्छिमारांनी ७० हजार नागरिकांचे प्राण वाचावल्याचा दावाही त्यांनी केला. देशातल्या मच्छिमारांची स्थिती शेतकऱ्यांपेक्षा वेगळी नसून त्यांच्यासाठी केंद्रामध्ये स्वतंत्र मंत्रालय असण्याची आवश्यकता असल्याचं गांधी म्हणाले.