मुंबई : 'बॉस इज ऑल्वेज राईट' अस आपल्याकडे म्हटल जात. ऑफिसमध्ये बॉस म्हणेल ती पूर्व दिशा असेही म्हटले जाते. बऱ्याचदा काम करताना आपल्याला असे बॉस भेटतात ज्यांच्याशी आपला ताळमेळ बसत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहीवेळा आपल्याला बॉस आवडत नाही तर अनेक बॉसना काही एम्प्लॉयी आवडत नाहीत. 


बॉसचा फायदा 


एखद्या कंपनीचा बॉस आपल्या एम्प्लॉयींसोबत नम्रतेने वागत असेल तर यामूळे बॉस चा खूप फायदा होतो असे  एका रिसर्च मधून समोर आले आहे. 


तर कामात स्वारस्य 


अमेरिकेतील ओहिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या फिशर कॉलेज ऑफ असोसिएट प्रोफेसर अॅण्ड स्टडीच्या वरिष्ठ रिसर्च जिया हू यांनी यांसंबधी आपले मत मांडले आहे.


जर कंपनीच्या प्रमुखाची वागणूक आपल्या कर्मचाऱ्यांप्रती विनम्रतेची असेल तर त्या कंपनीचे कर्मचारी कामात अधिक स्वारस्य दाखवितात.


कामावर परिणाम 


तुम्ही नोटीस केलयं का, तुमचा बॉस तुमच्याशी विनम्रतेने वागतो ? जर तो असे वागत नसेल तर याचा थेट परिणाम कामावर होतो. नेहमी रागात असणारा बॉस असल्यास कर्मचारीही तणावात राहतात. मग तुम्हाला टीम बदलण्याची गरज असते किंवा कंपनी सोडण्याची गरज असते. 


६ महिन्यांचा सर्व्हे


सहा महिन्यांचा अवधीत तीन टप्प्यांमधून या निष्कर्षांपर्यंत रिसर्चरना पोहोचता आले. 


कर्मचारी आणि बॉस यांचा सर्व्हे 


हा रिसर्च उत्तर चीनच्या प्रमुख शहरातील ११ टेलिकॉम आयटी कंपन्यांचे कर्मचारी आणि टीम लीडर यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून बनविला आहे.