तुमच्या स्मार्टफोनमध्ये `या` गोष्टी असतील तर लगेच डिलीट करा! अन्यथा बँक खातं होईल रिकामं
स्मार्टफोनच्या माध्यमातून दैनिक व्यवहारातील बऱ्याच गोष्टी सहज करणं सोप्या झाल्या आहेत. पण असं असलं तरी सायबर फ्रॉड होण्याची शक्यताही तितकीच बळावली आहे.
Bank Account Safety: सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनच्या माध्यमातून दैनिक व्यवहारातील बऱ्याच गोष्टी सहज करणं सोप्या झाल्या आहेत. पण असं असलं तरी सायबर फ्रॉड होण्याची शक्यताही तितकीच बळावली आहे. यासाठी आपल्या बँक अकाउंट सुरक्षित असणं गरजेचं आहे. त्यामुळे बँकेचे डिटेल्स फोनमध्ये स्टोअर करून ठेवल्या असल्यास काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हॅकर्सची नजर तुमच्या डिटेल्सवर पडू शकते. या डिटेल्सचा गैरफायदा घेऊन तुमचं बँक अकाउंट रिकामं खेलं जाऊ शकतं. त्यामुळे स्मार्टफोन कोणत्या गोष्टी असायला हव्या आणि कोणत्या नको? ते जाणून घेऊयात.
कधीही आपल्या स्मार्टफोनमध्ये बँकेशी निगडीत एटीएमचे डिटेल्स सेव्ह करून ठेवू नये. त्याचबरोबर एटीएमचा फोटो आणि डिटेल्स कोणासोबतही शेअर करू नये.
चुकूनही तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये ऑनलाइन बँकिंग डिटेल्स म्हणजेच यूजर नेम, आयडी आणि पासवर्ड किंवा एमपिन ठेवू नका. हॅकर्स स्मार्टफोनमधून ही माहिती चोरू शकतात. या माध्यमातून तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात.
जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतील तर बँकेचे अकाउंट नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करू नका. बँकेची माहिती जितकी खासगी ठेवाल तितकं योग्य राहिल.
जर तुम्ही सोशल मीडिया, जसं की फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून बँक डिटेल्स कुटुंबियांसोबत शेअर केल्या असतील. तर लगेच डिलीट करा. अन्यथा माहिती लीक होऊ शकते.
स्मार्टफोनमधून बँकेचं अॅप वापरत असाल तर पब्लिक वाय-फायचा वापर करू नका. ओपन नेटवर्क असल्याने सेफ नसतं. त्यामुळे बँक अकाउंट डिटेल्स हॅक होण्याची शक्यता असते.