पैशांची अडचण असेल मित्र किंवा नातेवाईकांकडे लगेच मागू नका, बँकेच्या या सुविधेबद्दल जाणून घ्या
पैशांची अडचण असेल तर टेन्शन घेऊ नका. कारण बँकांकडून तुम्हाला काही सुविधा मिळतात.
Money Need: प्रत्येकाला कधी ना कधी पैशांची गरज पडते. यासाठी नातेवाईक आणि मित्रांची मदत घेतली जाते. नातेवाईक आणि मित्र चांगले असतील पैसे लगेच मिळतात. पण कधी कधी नाकं मुरडली जातात, अनेकदा तोंडावर पैसे नाहीत म्हणून सांगून मोकळे होतात. पण जर तुमच्यावर अशी वेळ आली तर टेन्शन घेऊ नका. कारण बँकांकडून तुम्हाला काही सुविधा मिळतात. त्यात तुमच्या बँकेत उपलब्ध असलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेचे कर्ज घेऊ शकता. होय, बँकेच्या या सुविधेचा लाभ तुम्ही कोणत्याही परिस्थितीत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ कसा घेऊ शकता, ते जाणून घ्या
ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे
बहुतेक बँक ग्राहकांना इतकं माहिती असतं की, फक्त बँक खात्यातील रक्कम काढू शकतात. परंतु तसं नाही, तुम्ही या रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकता. यासाठी अनेक बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या त्यांच्यासाठी खास सुविधा देतात. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती असताना तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
ही सुविधा कशी मिळवाल
ही सुविधा बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी त्यांच्या काही ग्राहकांना प्री- अप्रूव्ड केलेली असते. तसेच काही ग्राहकांना यासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागतो. यासाठी बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाइन इंटरनेट बँकिंगद्वारेही अर्ज करता येईल. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही बँकेकडून प्रोसेसिंग फी आणि त्याच्याशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे. काहीवेळा बँका सॅलरी अकाउंटसह ओव्हरड्राफ्ट सुविधाही देतात. तुमच्या पगाराच्या दोन ते तीनपट ओव्हरड्राफ्ट मर्यादा असू शकते. पण यासाठी तुमचे खाते त्याच बँकेत असले पाहिजे ज्या बँकेत तुमचे सॅलरी अकाउंट आहे.