पगारावरील Tax वाचवण्यासाठी हे 10 पर्याय वापरुन भविष्याची तरतूद आत्ताच करा....
कुठे आणि कशी गुंतवणूक करावी जेणेकरुन पगारावरील कर कमी होईल हे तुम्हाला माहित असले पाहिजे.
मुंबई : आपल्या पगराची तारीख जेव्हा जवळ येते तेव्हा आपल्याला खूप आनंद होते. कारण त्यामुळे आपल्या हातात पैसे येता आणि त्यामुळे आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी विकत घेऊ शकतो. या पगारावर लागणारा कर हा आपल्या चिंतेचा विषय आहे. परंतु एक जागरुक नागरीक असल्यामुळे आपल्याला आपल्या पगाराचा काही भाग सरकारला कर स्वरुपात द्यावा लागतो. त्याला जर भरले नाही तर सरकार आपल्या विरुद्ध कठोर कारवाई देखील करू शकते.
कुठे आणि कशी गुंतवणूक करावी जेणेकरुन पगारावरील कर कमी होईल हे तुम्हाला माहित असले पाहिजे. असे केल्याने तुमची बचत देखील वाढेल आणि शेवटी एक पुरेशी निवृत्ती निधी तयार होऊ शकेल.
जर तुम्हाला पगार मिळाला असेल, तर बाजारात कोणती उत्पादने किंवा योजना आहेत ज्यातून कर वाचविला जाऊ शकतो हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. या योजनांच्या मदतीने कराचे नियोजन करून तुम्हाला बचतीचे मार्ग उघडता येतील. या साठी तुम्ही आयकर कायदा 1961 पाहू शकता, ज्यात बचतीची संपूर्ण माहिती मिळेल. यामध्ये पगारदार लोकं 10 प्रकारे आपले कर कसे वाचवू शकतात हे माहित करुन घ्या.
1-ईपीएफ
ही सर्वात लोकप्रिय कर बचत योजना आहे. या निधीमध्ये कंपनी आणि कर्मचारी दोघांचेही योगदान आहे. कर्मचार्याच्या खात्यात जमा झालेल्या पैशांवर आणि त्याद्वारे मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर आकारला जात नाही.
2-पीपीएफ
याला सार्वजनिक भविष्य निधी म्हणतात. पगारदार लोक पीपीएफमध्ये गुंटावणुक करुण कर वाचू शकतात. रिटार्मेंटच्या वेळी यामधून तुम्हाला गॅरेंटीड निधी मिळेतो ज्यावर कर लागत नाही.
3-इक्विटी लिंक्विड बचत योजना
त्याला ELSS असे म्हणतात, जो पगारदारांसाठी कर वाचविण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. आपण कर्मचारी असल्यास आपल्या पगाराच्या करपात्र उत्पन्नात सूट देण्यात आली आहे. या अंतर्गत गुंतवलेल्या पैशांवर कर आकारला जात नाही. परंतु जर यातील परतावा 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर 10% दराने कर लागू होईल.
4-राष्ट्रीय पेन्शन सिस्टम किंवा NPS
NPS हा दीर्घकालीन बचत पर्याय आहे. ज्यांना लवकर सेवानिवृत्ती घ्यायची आहे त्यांनी या योजनेत गुंतवणूक करू शकता. पीपीएफ, एफडीच्या तुलनेत NPS जास्त परतावा देते. त्याअंतर्गत तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंतच्या करात सूट मिळवू शकता.
5-कर बचत FD
टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट FDमध्ये गुंतवणूक करून आपण पैसे वाचवू शकता. ज्यामुळे तुम्हा मोठा फंड देखील जमा करु शकता. ही एक प्रकारची FD योजना आहे, ज्यात तुमची 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर कर सूट दिली जाते. पगार घेणाऱ्या लोकांसाठी 5 वर्षांची कर बचत सर्वोत्तम मानली जाते. गुंतवणूकीच्या पैशावर करामध्ये सूट मिळते, परंतु याच्या परताव्यावर कर आकारला जातो.
6-जीवन विमा
पगारदार लोक जीवन विमा घेऊन आपला कर वाचवू शकतात. यामध्ये विमा संरक्षणासह कर बचतीची संधी आहे. यासह, मॅच्यूरीटीवर प्राप्त झालेला पैसा देखील बचतीचा एक मोठा मार्ग बनतो. आयकर कलम 80 सी अंतर्गत जीवन विमा प्रीमियमवर कर सूट आहे. त्याच बरोबर सर्व्हायवल बेनिफिट आणि डेथ बेनिफिटच्या रुपात मिळालेले पैसेही करमुक्त असतात.
7-घरभाडे भत्ता
जर पगारदार लोकं भाड्याच्या घरात राहतात, तर ते भाडेवर कर माफी मागू शकतात. घरभाडे भत्ता हा तुमच्या पगाराचा एक भाग आहे. ज्यावर पूर्ण कर लावला जात नाही. आपण आपल्या स्वत: च्या घरात राहून कंपनीच्या वतीने घरभाडे भत्ता घेतल्यास त्यावर कोणत्याही प्रकारची कर सूट मिळत नाही.
8- प्रवास भत्ता LTC
LTC अंतर्गत कर सहजतेने वाचविला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला यात्रा भत्ता द्यावा लागेल. करमुक्तीचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा कर्मचारी प्रवासाला जाईल. LTC अंतर्गत सवलत केवळ घरगुती प्रवासातच मिळू शकते. कराचा लाभ बस किंवा ट्रेनच्या भाड्याने घेतला जाऊ शकतो, परंतु प्रवासी खर्चावर नाही.
9-ग्रॅच्युटी
कंपनीकडून मिळालेल्या ग्रॅच्युटीवर कर सूटचा फायदा घेऊ शकता. कर्मचार्यांना वेतन, राजीनामा, सेवानिवृत्ती, मृत्यू किंवा काढून टाकण्यावर ग्रॅच्युटी दिली जाते. कर्मचाऱ्याने कोणत्याही एका कंपनीमध्ये कमीतकमी 5 वर्षे काम केले पाहिजे. कर्मचार्यांकडून मिळालेल्या ग्रॅच्युटीच्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही. परंतु या रक्कमेची मर्यादा 20,00,000 रुपये निश्चित केली गेली आहे.
10-आरोग्य विमा
आरोग्य विमा योजनेद्वारे आपण कर देखील वाचवू शकता. आरोग्य विम्यास भरलेल्या प्रीमियमवर कोणताही कर लागत नाही. आपण कुटुंबातील पत्नी आणि मुलांसाठी आरोग्य विमा काढल्यास आपण त्यावरही कर लाभाचा दावा करू शकता.