आयआयएम च्या विद्यार्थ्याची आत्महत्या...
लखनऊ येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) च्या एएका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लखनऊ : लखनऊ येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) च्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉस्टेलमधेच त्याने गळफास लावून घेतला. मात्र अद्यापही आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना तपासात सुसाईड नोट मिळाली नाही. मात्र पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि डायरी ताब्यात घेऊन पुढचा तपास सुरु केला आहे.
माडियाव इन्स्पेक्टर राघवन कुमार सिंग यांनी सांगितले की, हा विद्यार्थी कोलकाता येथे राहणारा होता. त्याचे नाव निहरेंदु मुखर्जी असून तो आयआयएम लखनऊ येथे एमबीएच्या द्वितीय वर्षात शिकत होता. बुधवारी संध्याकाळी पोलिसांना आयआयएम प्रबंधन यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा खोलीचा दरवाजा उघडा होता आणि नायलॉनच्या दोरीने विद्यार्थ्याचे शव पंख्याला लटकत होते.
खोलीतून सुसाईड नोट मिळाली नसली तरी पोलिसांनी त्याचा लॅपटॉप, मोबाईल, आणि डायरी जप्त केली आहे. फिंगर प्रिंट एक्सपर्ट्स आणि डॉग स्क्वॉयडच्या मदतीने पुढील तपास सुरु आहे.
मृत विद्यार्थ्याच्या घरी याबद्दल कळवले आहे. त्याचबरोबर पोस्टमार्टम करण्यात येईल. त्याचा व्हिडीओ देखील तयार करण्यात येईल. व त्यानुसार पुढचा तपास होईल, असे पोलिसांनी सांगितले.