मुंबई : प्रत्येक मुलीला आदर्श सून व्हायचं असतं. तर प्रत्येक सासूला आपल्या घरात येणारी सून ही देखील आदर्शच हवी असते. पण हे कसं शक्य आहे. या प्रश्नावर आता आयआयटी बीएचयूने तोडगा काढला आहे. महत्वाचं म्हणजे येथे महिलांना आदर्श सून होण्याचं योग्य ते शिक्षण दिलं जाणार आहे. या मुलींना येथे याबाबत ट्रेनिंग दिलं जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांना आणि तरूणींना यांच योग्य असं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आयआयटी बीएचयूच्या अंतर्गत सुरू केलेलं स्टार्ट अप "यंग स्किल्ड इंडिया'च्या अंतर्गत देण्यात येणार आहे. यंग स्किल्ड इंडियाने 3 महिन्यांचा हा कोर्स डिझाइन केला आहे. ज्यामध्ये सून होऊ घातलेल्या महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतात. या प्रशिक्षणाची सुरूवात 3 डिसेंबरपासून होत आहे. 


'डॉटर्स प्राइड : बेटी मेरी अभियान' असं या कोर्सला नाव देण्यात आलं आहे. तरूणींना सेल्फ कॉन्फिडन्स, इंटरपर्सनल स्किल, प्रॉब्लम सॉल्विंग स्किल, स्ट्रेस हँडलिंग, मॅरेज स्किलसोबतच कॉम्प्युटर आणि फॅशनचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. स्टार्ट अपचे सीईओ नीरज श्रीवास्तव यांनी सांगितले की, हा उपक्रम म्हणजे हटके प्रयत्न आहे. जो समजाकरता एक आदर्श बनू शकतो. या कोर्समध्ये प्रोफेशनल स्किल ट्रेनर, फॅशन डिझाइनर आणि काऊन्सिर यांची प्रमुख भूमिका असेल.


 3 डिसेंबरपासून हा कोर्स वनिता इंस्टीट्यूट आणि फॅशन डिझाइनमध्ये सुरू केला जाणार आहे. भारतात ही अतिशय उत्सुकतेची आणि गर्वाची बाब असणार आहे. याची अधिक माहिती तुम्ही 8009321506 या हेल्पलाईनवर घेऊ शकता.