Weather Update: (IMD) हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढच्या पाच दिवसांमध्ये देशभरात थंडीचा कडाका वाढणार आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, अंदमान आणि निकोबार बेट समूह तसंच लक्षद्वीप या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


कोणत्या राज्यांना हवामान खात्यानं दिला इशारा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर या पर्वतीय भागांमध्ये होणाऱ्या हिमवृष्टीचे थेट परिणाम देशाच्या इतर भागांमध्ये पाहायला मिळत आहेत. दिल्ली (Delhi) , उत्तर प्रदेश (UP), बिहार (Bihar), मध्य प्रदेश (MP) आणि छत्तीसगढ (Chattisgadh) या राज्यांमध्ये सध्या तापमान चांगलंच खाली गेलं आहे. तर, येत्या काही दिवसांत ही शीतलहर (Cold Wave) कायम असेल असंही सांगण्यात आलं आहे. 


हेसुद्धा वाचा: Nagpur: वाघ राहील नाहीतर आम्ही! जंगलानजीक असणाऱ्या शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात दहशत



राजस्थानातील (rajasthan) शेखावटी भागात थंडीचे परिणाम स्पष्ट दिसू शकतात. तर, माऊंट आबू भागामध्येही थंडीचा कडाका वाढू शकतो. तिथे उत्तर प्रदेशमध्ये हुडहूडी वाढल्यामुळं वातावरणार धुक्याचं प्रमाण जास्त दिसून येईल. वाहतुकीवर याचे थेट परिणाम दिसू शकतात. हवामान खात्याच्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही येणारे दिवस कडाक्याची थंडी असेल. 


उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही बोचरी थंडी (Maharashtra Cold wave)


देशाच्या उत्तर भागात होणाऱ्या थंडीमुळं सध्या महाराष्ट्रातही तापमान चांगलंच कमी होताना दिसत असून, पुणे (Pune), मुंबईसह (Mumbai) विदर्भातही सुरेख वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान 10 अंशांहूनही कमी आहे. त्यामुळं गावठाणांच्या ठिकाणी शेकोट्या करुन नागरिक ऊब घेताना दिसत आहेत. कुठे चहाच्या टपऱ्यांवर गर्दी दिसत आहे. पर्यटनस्थळांकडे वाढणारा पर्यटकांचा ओघही या काळात वाढलेला आहे. इगतपुरी, पाचगणी, महाबळेश्वर, कोकण यांसारख्या ठिकाणांवर येणाऱ्यांच्या संख्येतही येत्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळू शकतं.