नवी दिल्ली : कोरोना Coronavirus व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील अनेक राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. ज्यानंतर शुक्रवारी सकाळीच त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधत एकजुटीने कोरोनावर मात करण्याचा संदेश दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरच्या या प्रादुर्भावामुळे जो अंधकार देशात पसरला आहे, त्याचा सर्वांनीच एकजुटीने प्रतिकार करत या अंधकारावर एकजुटीच्या प्रकाशाने मात करायची आहे, हा अतिशय महत्त्वाचा आणि सकारात्मक संदेश त्यांनी दिला. मोदींच्या या संबोधनपर भाषणातील काही महत्त्वाचे आणि लक्षपूर्वक वाचण्याजोगे मुद्दे खालीलप्रमाणे 


* कोरोना व्हायरसचा हा अंधकार देशातील १३० कोटी नागरिकांनी एकजुटीने मिटवायचा आहे. 


* कोरोनाचा परिणाम गरीबांवर सर्वाधिक झाला आहे. कामगारांचे लोंढे रस्त्यावरून निघालेले दिसत होते. त्यांचे घरभाडे, जेवणाचे हाल झाले. अशा वर्गाप्रती मोदींनी जबाबदारीचं वक्तव्य केलं. 


* अटीतटीच्या या प्रसंगी आपण कोणीही एकटं नाही. जनतारुपी महाशक्तीचा साक्षात्कार करत राहिलं पाहिजे. यामुळेच आपल्याला मानसिक आधार आणि लक्ष्यप्राप्ती होईल. 


* रविवारी, म्हणजेच ५ एप्रिल २०२०ला सर्वांनीच आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा. घरातील दरवाजा किंवा बाल्कनीत उभं राहून नऊ मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, विजेरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट नऊ मिनिटांसाठी सुरु ठेवा. 


* देशाला संबोधित करतेवेळी मोदींनी एकजुट आणि प्रकाशाच्या शक्तीला अधोरेखित केलं. 



* मुख्य म्हणजे हे सर्व उपाय केले जात असताना सोशल डिस्टंसिंगच्या लक्ष्मणरेषेचं कुठेही उल्लंघन होणार नाही, अर्थात नियमांची पायमल्ली केली जाणार नाही याचंही भान असावं याकडे पंतप्रधानांनी सर्वांचं लक्ष वेधलं. 


* देशाला संबोधित करत असताना मोदींनी अतिशय आत्मविश्वासाने देशवासियांना धीर देत ते या कठीण प्रसंगती एकटे नसल्याचं म्हणत सर्वांनाच एकमेकांची साथ असल्याची भवाना व्यक्त केली. शिवाय कोरोनावर मात करण्याचा .हा लढा आपण एकत्रितपणे जिंकूया असा संदेशही दिला.