RBI गवर्नरकडून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी खूशखबर; जबरदस्त सेवा होणार सुरू
जर तुम्ही देखील क्रेडिट कार्ड युजर असाल आणि युपीआयदेकील वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी क्रेडिट कार्ड युजर्सला आनंदाची बातमी दिली आहे.
मुंबई : तुम्ही क्रेडिट कार्ड तसेच युपीआय वापरकर्ते असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सुधारित पतधोरण जारी करताना आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी यासंबधी घोषणा केली.
रिझर्व बँक लवकरच सुरू करणार ही सेवा
आरबीआयतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, युपीआयला क्रेडिट कार्डशीही जोडता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला युपीआयने पेमेंट करायचे असेल तर, सेविंग अकाऊंट आणि करंट अकाऊंटसह तुम्हाला क्रेडिट कार्डनेचाही वापर करता येईल. रिझर्व बँकेतर्फे लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
रुपे कार्डपासून होणार सुरूवात
आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीने घेतलेल्या निर्णयांबाबतीत माहिती देतांना सांगितलं की, बँक डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. युपीआयच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याची सुरूवात रुपे क्रेडिट कार्डपासून करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मास्टरकार्ड आणि व्हिजासाठी लवकरच यंत्रणा
युपीआयला क्रेडिट कार्डशी जोडण्याची प्रक्रिया नंतर मास्टरकार्ड (Mastercard)आणि वीजा (Visa) कार्डपर्यंत देखील वाढवण्यात येणार आहे. ही सुविधा त्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे. जे आपल्या गरजेनुसार क्रेडिट कार्डवरून रोख काढतात. किंवा पेटीएम सारख्या वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डचे पैसे ऍड करतात.
कसे होणार क्रेडिट कार्डने युपीआय पेमेंट
ही सुविधा सुरू झाल्यानंतर क्रेडिट कार्ड स्वाइप शिवायदेखील पेमेंट करता येणार आहे. यासाठी आधी युपीआय तुमच्या क्रेडिट कार्डला लिंक करणे गरजेचे असेल.