मुंबई : आधार कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे, आता आधार कार्डसंदर्भातील काही नियम बदलणार आहेत. जर तुम्ही आधार कार्डमध्ये काही बदल करणार असाल, तर तुमच्या वडिलांशी किंवा पतीशी असलेल्या नात्याची ओळख कार्डमध्ये आता उघड होणार नाही. म्हणजेच, आता आधार कार्डमध्ये पती किंवा वडिलांचे नाव अनिवार्य नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलिसांचे निवृत्त उपनिरीक्षक रणधीर सिंह जेव्हा त्यांच्या पत्नीच्या आधार कार्डमध्ये त्यांच्या घराचा पत्ता बदलण्यासाठी दिला तेव्हा त्यांनी पाहिले की, 'वाइफ ऑफ' ऐवजी 'केअर ऑफ' मध्ये त्यांचे नाव दिसले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.


आधी त्यांना वाटले की, कॉम्प्युटर सिस्टीममध्ये काही अडचण आली असेल, पण नंतर जेव्हा ते आधार कार्ड बदलण्यासाठी पोस्ट ऑफिस, बँक आणि इतर अनेक अधिकृत केंद्रांवर गेले, परंतु तेथे देखील त्यांना त्यांचे नाव 'केअर ऑफ' मध्येच दिसत होते.


वास्तविक, रणधीर सिंह पूर्वी अशोक विहार पोलीस वसाहतीत राहत असत, परंतु निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पितामपुरा येथे राहण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच ते आधार कार्डमधील कुटुंबातील सर्व सदस्यांचा पत्ता बदलण्यासाठी गेले. मुलाच्या आधार कार्डमध्ये बदल केल्यावर वडिलांच्या नावासमोर केअर ऑफ येत होते.


सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय


यासंदर्भात, भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 2018 मध्ये आधारबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सविस्तर निर्णय होता. त्या निर्णयात, लोकांच्या गोपनीयतेबद्दल बोलले गेले आहे आणि त्यामुळे आधार कार्डमध्ये संबंधांची माहिती दिली जात नाही. मात्र, वर्षाच्या कोणत्या महिन्यापासून हा बदल करण्यात आला, याबाबतची माहिती UIDAI ने दिलेली नाही.


आयटी मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटरचे (सीएससी) व्यवस्थापकीय संचालक दिनेश त्यागी यांनी आधारमध्ये कोणत्याही बदलासाठी अधिकृत माहिती दिली आहे की, आता आधार कार्डमध्ये वडील, मुलगा, मुलगी च्या ऐवजी 'केअर ऑफ' छापले जात आहे.


आधार वैयक्तिक ओळख


12 अंकी यूनीक क्रमांक आधार कार्डमध्ये दिला आहे आणि त्याची एक विशिष्टता आहे जी त्याच्या फिंगरप्रिंट आणि डोळ्यांशी संबंधित आहे. आधार कार्ड बनवल्यानंतर कोणीही त्यांचे नाव बदलले तरी त्याला युनिक नंबरनेच ओळखले जाईल. हे पूर्णपणे वैयक्तिक ओळखपत्र आहे.


अनाथांना यापुढे समस्या येणार नाहीत


सेवानिवृत्त उपनिरीक्षक सिंह म्हणाले की, विशेष परिस्थितीत, त्यांची पत्नी आता ती कोणाची पत्नी आहे याचा दावा करण्यास सक्षम असेल. दुसरीकडे, तज्ञ असेही म्हणत आहेत की, आधार कार्डमधील या बदलामुळे जे लोक अनाथ आहेत किंवा ज्यांचे या जगात कोणी नाही त्यांनाही यामुळे आधार कार्ड सहज मिळू शकेल.