इस्लामाबाद : पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महागाईचा प्रश्न भेडसावत आहेत. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे हे आर्थिक संकट सोडवायचे कसे असा प्रश्न आहे. तसेच अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी न घालता. पाकिस्तान भूमीतील दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात सांगितले आहे. त्यामुळे पाकिस्तान पुरता कोंडीत सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधावण्यावर पाकिस्तानचा भर आहे. त्यामुळे हे संबंध पूर्वीप्रमाणे सुरळीत राहण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनाल्ट ट्रम्प यांची भेट इम्रान खान २२ जुलै रोजी घेणार आहेच. यावेळी दोन्ही देशांमधील ताणलेले संबंध सुधारण्याबाबत या दोन देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान या दोघांची भेट होणार असल्यासंदर्भातले एक पत्र व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आले आहे. त्यामुळे याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.



अमेरिका - पाकिस्तान या दोन देशांमधली शांतता, स्थैर्य आणि आर्थिक मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार असल्याचीही माहिती आहे. त्याचप्रमाणे दहशतवादाचा बिमोड करणे, सुरक्षा, व्यापार या विषयांवरही चर्चा होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. 


इम्रान खास यांच्या दौऱ्याची पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी मीडियाला माहिती दिली. डोनाल्ड ट्रम् यांनी गेल्या महिन्यातच इम्रान खान यांना अमेरिकेला येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने इम्रान खान जाऊ शकले नाहीत. आता ही भेट २२ जुलै रोजी होणार आहे, कुरेशी यांनी सांगितले.


दरम्यान, अमेरिका - पाकिस्तान भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानच्या भूमीतून दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे अमेरिका काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.