`मोदी सर्वांना देणार चंद्रावर घर... आणि चंद्रावर जाण्यासाठी रॉकेटही`
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना निशाण्यावर घेतलंय. बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधींनी भंपक घोषणांवर टीका केलीय.
नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना निशाण्यावर घेतलंय. बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधींनी भंपक घोषणांवर टीका केलीय.
'२०२८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या प्रत्येक व्यक्तीला चंद्रावर घर देणार आहेत आणि २०१३० साली मोदी चंद्रालाच धरतीवर घेऊन येणार आहेत' असं ट्विटरवर म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीका केलीय.
'२०२५ पर्यंत मोदीजी गुजरातच्या प्रत्येक व्यक्तीला चंद्रावर जाण्यासाठी रॉकेट देणार आहेत... मोदीजी तुमचा पक्ष २२ वर्षांपासून इथं सत्तेत आहे आणि तुम्ही म्हणत आहात की २०२२ पर्यंत गुजरातमधून गरिबी हटवणार आहात' असं राहुल गांधींनी म्हटलंय.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली. ते तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत... आज तिसऱ्या दिवशी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.
एरतर्फी आणि मनमानी पद्धतीनं नोटाबंदी लागू करत काळं धन ठेवणाऱ्यांना पैसे सफेद करण्यात मोदींनी मदत केली... असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.