२०१९: काँग्रेससोबत नसेल सीपीएम
२०१९मध्ये होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही? यावरही काही राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. याच विषयावर मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) नेत्यांची एक बैठक रविवारी पार पडली. सूत्रांकडील माहितीनुसार, या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णयासंबंधी चर्चा झाली.
कोलकाता : २०१९मध्ये होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही? यावरही काही राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. याच विषयावर मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) नेत्यांची एक बैठक रविवारी पार पडली. सूत्रांकडील माहितीनुसार, या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णयासंबंधी चर्चा झाली.
२०१९ साठी राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी
२०१४ नंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये चौखूर उधळलेल्या वारूला लगाम लावण्यासाठी विरोधक जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी प्रामुख्याने काँग्रेस आघडीवर असून, विविध पक्ष आणि राजकीय गटांसोबत काँग्रे आघाडी करण्यास काँग्रेस उत्सुक आहे. पण, २०१४चा धक्कादायक निकाल आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती पाहता सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही सावध झाले असून, २०१९ साठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने प्रादेशिक तसेच, राष्ट्रीय पातळीवर कार्यकरत असलेले पण, काँग्रेस, भाजपच्या तुलनेत ताकद कमी असलेले पक्ष मोठ्या पक्षांसोबत आघाडी करावी की, नाही? याबत विचार करत आहेत. त्यामुळे सीपीएमनेही आपली मोर्चेबांधनी सुरू केली आहे.
काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा सीपीएमचा निर्णय
सूत्रांकडील माहितीनुसार, कोलकातामध्ये रविवारी झालेल्या सीपीएमच्या बैठकीत काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेले अनेक महिने याबाबत विचारमंधन सुरू होते. अखेर या पक्षाने काँग्रेससोबत न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेस आणि सीपीएम यांच्या आघाडीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
प्रदीर्घ काळ विचार केल्यावर सीपीएमकडून निर्णय
राजकीय वर्तुळात चर्चा होती की, सीपीएमच्या पक्षीय समितीकडे काँग्रेसने आघाडीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यामुळे या प्रस्तावावर विचार करून निर्णयाचा चेंडू सीपीएमच्या कोर्टात होता. अखेर प्रदीर्घ काळ विचार विनिमय केल्यावर यावर सीपीएमकडून यावर निर्णय घेण्यात आला. २०१९मध्ये सीपीएम काँग्रेससोबत जाणार नाही.