पाटणा : Bihar Rain :वादळी पावसात कोसळलेल्या विजेमुळे 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. बिहारच्या भागलपूर परिसरात अचानक आलेल्या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. राज्यातील भागलपूर परिसरात अचानक आलेल्या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहेत. तिथे वीज कोसळल्यामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरनगरमध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला.  अचानकपणे झालेल्या हवामान बदलामुळे वादळ-वाऱ्यांसहीत पाऊस झाला. त्यामुळे जागोजागी वृक्ष उन्मळून पडली, तर विजेचे खांबदेखील कोसळले.


 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आर्थिक मदत देण्याची घोषणा केलेली आहे. नितीश कुमार यांनी ट्विट करत म्हणाले की, राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज कोसळल्यामुळे 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दु:खद घटना आहे. मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत करण्याचे आदेश देण्यात दिले आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत  दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी परमेश्वर मृतांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती देईल, असे म्हटले आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासनाकडून मदतीचे कार्य केले जात आहे.