इंदूर : अनेकांचे विवाहबाह्य संबंध असतात. लग्नानंतरही पती किंवा पत्नी हे एकमेकांच्या नकळत दुसऱ्याच सोबत रिलेशनमध्ये राहतात. एखाद दिवस या सर्वाचा भांडाफोड होतो. संसाराच पत्नी पत्नीचे खटके उडतात. प्रकरण अगदी टोकाला जातं. यातून एकतर पती पत्नीचा काटा काढण्यासाठी अगदी टोकाचं पाऊल उचलतो किंवा विभक्त होण्याचा पर्याय निवडला जातो. घटस्फोटापर्यंत प्रकरण जातं. या घटस्फोटासाठी दोघांना न्यायालयाच्या खेटा माराव्या लागतात. पैशांसह वेळही वाया जातो. पण या पतीने जो समजुतदारीचा प्रयत्न निवडलाय, त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा सर्व प्रकार मध्य प्रदेशातील इंदूरमधील आहे. (in madhya pradesh Indore After 8 years of marriage someone else's entry into the woman's life, husband merged the two)
 
नक्की काय झालंय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर त्याचं झालं असं की, लग्नाच्या 8 वर्षानंतर पत्नीच्या आयुष्यात प्रियकराची एंट्री झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. पत्नीच्या या विवाहबाह्य प्रकरणाची चाहूल पतीला लागली. आता तुम्हाला वाटेल की, पतीने पत्नीला मारहाण केली असेल किंवा त्या प्रियकराला चोपला असेल. पण तसं काहीच झालेलं नाही. पतीने चक्क घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.  


नवऱ्याकडून घटस्फोटासाठी न्यायालयात धाव


बायकोचं लफडं समजल्यानंतर नवऱ्याने विभक्त होण्याचं ठरवलं. त्यानुसार त्याने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. दोघांचा घटस्फोटही झाला. कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीशासमोर पत्नीने स्वीकार केलं की तिचं आणखी कोणावर प्रेम आहे, तसेच त्याच्यासोबत लग्न करायचंय. नवरा-बायको या दोघांची बाजू न्यायालयाने जाणून घेतली. दोघांचा घटस्फोटाचा अर्ज स्वीकार केला गेला.  आता दोघेही स्वतंत्र राहतात. या दोघांना एक 5 वर्षाची मुलगी आहे. त्या मुलीच्या सांभाळ करण्याची जबाबदारी ही आईला देण्यात आलीये.


दोघांचा घटस्फोट झाला असला तरी, वडिलांना आपल्या मुलीला कोणत्याही अटीविना भेटता येणार आहे. भविष्यात घटस्फोटीत नवऱ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचं आश्वासन पत्नीने न्यायालयात दिलं. ती महिला आता आपल्या प्रियकरासोबत आनंदी आहे.


दोघांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सर्वसाधारणपणे अर्ज केल्यानंतर दोघांना विभक्त होण्यापासून वाचवण्यासाठी न्यायालय दोघांना आणखी एक संधी देते. त्यानुसार संबंधित दोघांना काही महिने एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितलं जात. त्यानंतरही दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असल्यास न्यायालय पुढील कार्यवाही करते. या दोघांचंही न्यायालयाने समुपदेशन केलं. दोघांना फार समजवण्याचा प्रयत्न केला. इतकच नाही, तर पत्नीच्या सासरकडच्या लोकांनाही समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही फायदा झाली नाही. त्यामुळे न्यायालयाने अखेर घटस्फोटाचा अर्ज स्वीकार केला.  


या विवाहितेचा प्रियकर हा अविवाहित आहे. तसेच ही विवाहित महिलाही पतीपासून 18 महिन्यांपासून दूर राहत आहे. माहितीनुसार, या महिलेला प्रियकराकडून लवकरच अपत्यप्राप्ती होणार आहे.