गुरू गोविंद सिंग यांच्या सन्मानारार्थ नाणे जारी
शिखांचे 10 वे गुरू गोविंद सिंग यांच्या 352 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ स्मारक नाणे जारी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शिखांचे 10 वे गुरू गोविंद सिंग यांच्या 352 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ स्मारक नाणे जारी केले. गुरू गोविंद सिंह हे एक चांगले योद्धा आणि कवी असल्याचे गौरवोद्गार यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पंतप्रधान निवासात झालेल्या या कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देखील उपस्थित होते. गुरू गोविंद सिंग यांनी खालसा ग्रंथाच्या माध्यमातून देश जोडला. त्यांच्या सन्मानार्थ नाणे जारी करण्यास मिळणे हे माझे सौभाग्य असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
बहुआयामी व्यक्तीमत्व
गुरू गोविंद सिंग यांचे काव्य हे भारतीय संस्कृतीतले बारकावे आणि आपल्या जीवनातील सरळ अभिव्यक्ती असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जसे त्यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते तसेच त्यांचे काव्य देखील विविध विषयांना सामावून घेणारे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याआधी पाच जानेवारी 2017 ला पटनामध्ये गुरू गोविंद सिंग यांच्या 350 व्या जयंतीला आयोजित समारोहात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी एक स्मारक पोस्ट तिकिट देखील जारी केले होते. खालसा पंथच्या माध्यमातून देशाला एकत्रित करणाऱ्या गुरू गोविंद सिंग यांच्या प्रयत्नाला पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखीत केले.