कोलकाता : तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधल्या लोकसभेच्या सर्व ४२ जागा जिंकेल असा विश्वास, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे. तर २०१४ मध्ये जिंकलेल्या अवघ्या २ जागाही यंदा भाजपला पश्चिम बंगालमध्ये जिंकता येणार नाहीत. त्यामुळे भाजपला राज्यात भोपळ्यावरच समाधान मानावे लागेल, असा दावाही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. देशातही यावेळी भाजपाचं सरकार येणार नाही असं त्या म्हणाल्या. हावडा जिल्ह्यातल्या अंदुल मधल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तृणमूल काँग्रेसचे चाळीस आमदार काय एकही आमदार तुमच्यासोबत येणार नाही अशा शब्दांत, टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला. काल पश्चिम बंगालमधल्या प्रचारसभेत २३ मे नंतर टीएमसीचे ४० आमदार आपल्याकडे येणार असल्याचं मोदींनी म्हंटले होते.