लखनऊ : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार यांना आयकर विभागाने मोठा दणका दिला आहे. आयकर विभागाने कारवाई करताना त्यांना ४०० कोटी रुपये किमतीची सात एकरची जमीन जप्त केली आहे. ही जमीन बेहीशोबी संपत्तीतून घेतल्याचे पुढे आले आहे. ही जमीन उत्तर प्रदेशातील सधन भाग नोएडा येथे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायावती यांचा भाऊ आनंद कुमार यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात येत होती. याच दरम्यान त्यांच्याकडे एक बेहीशोबी जमीन असल्याचे आयकर विभागाला समजले. ज्यानंतर त्यांनी छापा मारून ही कारवाई केली. आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्रलता या दोघांची ही जमीन असल्याचे पुढे आले आहे. ही बेहीशोबी जमीन जप्त करण्याचे आदेश १६ जुलै रोजी देण्यात आले होते. त्यानुसार आज आयकर विभागाने ही कारवाई केली. 



आनंदकुमार यांच्या नावे आणखी बेहीशोबी संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. याची माहितीही आयकर विभागाला मिळाली आहे. या संपत्तीवर जप्ती येण्याची शक्यता आहे. आयकर विभागासोबतच ईडीकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.