जया टीव्हीच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी जया टीव्ही आणि डॉ नमाधु एमजीआर (तामिळ वृत्तपत्र) च्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला.
चेन्नई : आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी जया टीव्ही आणि डॉ नमाधु एमजीआर (तामिळ वृत्तपत्र) च्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही छापेमारी केली. आयकर विभागाच्या १० अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली आहे.
सूत्रांच्या मते कथित स्वरुपात टॅक्स चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. हे चॅनल जयललिता यांनी सुरु केलं होतं. मात्र, या चॅनलचा कारभार अण्णाद्रमुक नेता वीके शशिकला यांच्या परिवाराकडे आहे.
भ्रष्टाचार प्रकरणी शशिकला कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्यांचा भाचा विवेक जयरमन याच्याकडे सध्या चॅनलची कमान आहे.
सूत्रांच्या मते, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी विवेक जयरमन याच्या घरी आणि शशिकलाच्या परिवाराचं नियंत्रित असलेल्या जैज सिनेमावर छापेमारी केली आहे.