Income Tax:आर्थिक वर्ष 2023-24 संपायला आले आहे. पुढच्या आठवड्यात आर्थिक वर्ष संपेल. दरम्यान करदात्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. चालू आर्थिकवर्ष संपण्याआधी करदाते आपली महत्वाची कामे पूर्ण करु शकतात. चालू आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना आहे, जो 30 मार्च आणि 31 मार्चला समाप्त होईल. तर शुक्रवारी 29 मार्चला गुड फ्रायडे आहे. यामुळे सलग 3 दिवसांची सुट्टी आहे. पण कर विभागाने या सुट्टींच्यादिवशीदेखील काम करण्याचा निर्णय घेतलाय. 


सुट्टीतदेखील होणार काम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवार म्हणजेच 29 मार्चपासून रविवार 31 मार्चपर्यंत 3 सुट्टींच्या दिवसात टॅक्ससंबंधी कामे केली जातील. इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या या निर्णयामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कमी वेळ असल्याने करदाते चिंतेत होते. त्यांना इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. 


महत्वाची कामे पूर्ण करण्याची शेवटची संधी 


या महिन्याच्या शेवटच्या तारखेला AY2021-22 चा अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न (ITR-U) फाइल करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. तसेच टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटसहित टॅक्ससंबंधित कामे पूर्ण करण्याचीदेखील ही शेवटची संधी आहे. या महिन्याच्या शेवटी सुट्ट्यांमध्येदेखील सलग 3 दिवस काम होणार आहे. ही टॅक्सपेयर्ससाठी चांगली बातमी आहे. 


लॉंग विकेंडमध्ये शेअर मार्केट बंद 


या मोठ्या विकेंडमध्ये 29 मार्च चे 31 मार्चपर्यंत शेअर मार्केटचे कामकाज होणार नाही. त्यामुळे ट्रेडींग करणाऱ्या इन्व्हेस्टरसाठी ही वाईट बातमी आहे. तर दुसरीकडे या महिन्याच्या पाचव्या शनिवारी म्हणजे 30 मार्चला बॅंक खुल्या राहणार आहेत. बॅंकेशी संबंधित कामे तुम्ही पूर्ण करु शकता. 


टीडीएस कापला जाणाऱ्यांसाठी 30 तारीख खूप महत्वाची


टीडीएस कापला जाणाऱ्यांसाठी मार्चची 30 तारीख खूप महत्वाची आहे. याआधी यांना फेब्रुवारीसाठी स्पेसिफाइड सेक्शन्स अंतर्गत कापल्या जाणाऱ्या टॅक्ससाठी चालान डिटेल्स फाइल करावा लागायचा. FY2020-21   साठी अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्या टॅक्सपेयर्ससाठी ITR-U नवा फॉर्म सुरु करण्यात आलाय. यासंबंधित AY साठी नोटिफाइड आयटीआर फॉर्मचा वापर करावा लागणार आहे. यासोबतच कॅटगरीनुसार डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट किंवा इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड्सचा वापर करण्याच्या पर्यायासोबत इलेक्ट्रॉनिक फायलिंग आवश्यक असणार आहे.