जमशेदपूर : बिहार आणि झारखंड विभागातल्या आयकर खात्याच्या उत्पन्नात 19 टक्क्यांनी वाढ होणार आहे.


नवीन करदात्यांचा समावेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालू आर्थिक वर्षात बिहार आणि झारखंड विभागातून आयकर विभागाला मिळणाऱ्या प्राप्तिकरात चांगली वाढ झाली आहे. या वर्षी 3.25 लाख नवीन करदात्यांचा समावेश करण्यात प्राप्तिकर विभागाला यश आलं आहे.


उद्दीष्ट पूर्ती


यावर्षी बिहार आणि झारखंडच्या प्राप्तिकर विभागाने 13,200 कोटी रुपयांचं उद्दीष्ट ठेवलं होतं. त्यापैकी 7,075 रुपयांची प्राप्तिकराची वसूली करण्यात या विभागाला यश आलं आहे. उर्वरित उद्दीष्ट येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण केलं जाईल, असं मुख्य प्राप्तिकर आयुक्तांनी सांगितलं आहे.


सक्रिय प्राप्तिकर विभाग


आधारकार्डची उत्पन्नाशी जोडणी सक्तीची केल्यामुळे प्राप्तिकर चुकवणं अवघड झालंय. त्याचबरोबर मागच्या वर्षीच्या तुलनेत करबुडव्यांविरोधातल्या कारवाईतही यावर्षी वाढ झाली आहे. मागच्या वर्षी 10 केस दाखल झाल्या होत्या तर यावर्षी 84 केस दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बिहार आणि झारखंडचे मुख्य प्राप्तिकर आयुक्त के सी घुमारिया यांनी दिली आहे.