मुंबई: कोरोना काळात अनेक नोकऱ्या गेल्या व्यवसाय बंद झाले असले तरी आता हळूहळू अनलॉक झाल्यानंतर पुन्हा एकदा नोकरभरती सुरू झाली आहे. सरकारी नोकरीची संधी कोणाल नको असते प्रत्येकजण त्यासाठी प्रयत्न करत असतो. इनकम टॅक्स विभागात रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार भुवनेश्वर इथे चीफ इनकमटॅक्स कमिश्नर कार्यालयाकडून काही जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्टी टास्किंग स्टाफ, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, स्टेनोग्राफर ग्रेड- II आणि कर सहाय्यक या पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. स्पोर्ट कोट्याअंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. incometaxindia.gov.in ला भेट देऊन अर्ज करता येणार आहे. 


आयकर विभागातील भरती 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. या भरतीसाठी अधिसूचना 21 ऑगस्ट 2018 रोजी जारी करण्यात आली आहे. ज्यांनी अजूनही अर्ज भरलेला नाही अशा इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. 


एमटीएस- 04 पद - पगार 18000 ते 56900 प्रति महिना
एमटीएस पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दहावी पास असणं आवश्यक आहे. 
स्टेनोग्राफर- 01 पद 
स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना 12 वी पास असणं आवश्यक आहे यासोबत 50 शब्द प्रति मिनट इंग्रजी आणि 65 शब्द हिंदी प्रति मिनिट ट्रान्सक्रिप्शन स्पीड असायला हवा. 
टॅक्स असिस्टन्ट- 07 पद 25500 ते 81100
टॅक्स असिस्टन्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मान्यता प्राप्त विषयातून पदवी घेतलेली असावी. 
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 27 वर्ष असावे. 
इनकम टॅक्स इंस्पेक्टर- 03 पद 44900 ते 142400 प्रति महिना यासाठी  
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 30 वर्ष असावे.