काळ्या पैशासाठी आयकर विभाग घेणार सोशल मीडियाची मदत
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आता आयकर विभाग सोशल मीडियाची मदत घेणार आहे.
नवी दिल्ली : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आता आयकर विभाग सोशल मीडियाची मदत घेणार आहे. पुढील महिन्यापासून आयकर विभागाने ‘प्रोजेक्ट इनसाइट’ हाती घेतले आहे. या विशेष मोहिमेंतर्गत आयकर विभाग संबंधित व्यक्तीची सर्व माहिती आणि सोशल नेटवर्किंग साइटवरील माहिती पडताळून त्याद्वारे संबंधित व्यक्तीचा खर्च आणि घोषित उत्पन्नामधील फरक तपासून पाहणार आहेत.
करचोरी रोखण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घोषित केलेले उत्पन्न आणि संबंधित व्यक्तीचा खर्च यातील फरकाची तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न आणि संपत्तीची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाने पॅन कार्ड आधारशी जोडणे बंधनकारक केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, माहिती आणि तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पामुळे माहिती गोळा करण्यास मदत मिळेल आणि कर भरण्याच्या प्रमाणात सुधारणा होऊ शकेल.