नवी दिल्ली : Income tax department will take action against online gaming :ऑनलाईन गेम करणाऱ्यांची आता यापुढे खैर नाही, असा स्पष्टच इशारा आयकर विभागाने दिला आहे. त्यामुळे यापुढे 'ऑनलाईन गेमर्स' (Online gaming) आयकरच्या रडारवर ( ​Income tax department ) आले आहेत. 3 वर्षांत 58 हजार कोटी जिंकले आहेत. त्यामुळे आता कर भरा अन्यथा कडक कारवाई होणार, असा स्पष्ट इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 3 वर्षांत ऑनलाईन गेमच्या माध्यमातून तब्बल 58 हजार कोटी रुपयांच्या रकमेचं वितरण बक्षिसापोटी झालेले असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेनं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला दिलीय. त्यानुसार आता मंडळाने हा कारवाईचा इशारा दिलाय.


वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन गेम खेळत पैसे कमाविणारे आता आयकर विभागाच्या रडारवर आलेत. या लोकांनी बक्षिसासाठी मिळविलेली रक्कम स्वत:हून जाहीर करत त्यावर लागू असलेला कर भरणा करावा अन्यथा त्यांना कडक कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिला आहे.