ज्यांनी घर भाड्याने दिले आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, आता टॅक्समध्ये अशी सूट मिळवा
जर तुम्ही तुमचे घर किंवा घराचा काही भाग भाड्याने दिला असेल, तर सरकारच्या वतीने त्यांना करातून सूट देण्यात आली आहे
मुंबई : इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लोकं आता या टॅक्समध्ये त्यांना कशी सूट मिळेल असे पर्याय शोधत आहेत. इनकम टॅक्स नियमांनुसार करदात्यांना वेगवेगळ्या अटींच्या आधारावर करातून सूट देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, जे लोकं भाड्याने राहातात त्यांना इनकम टॅक्स रिटर्न भरण्यात सूट देण्यात आली आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, भाडेकरूंप्रमाणे, जमीनदारांनासुद्धा करातून सूट देण्यात आली आहे.
जर तुम्ही तुमचे घर किंवा घराचा काही भाग भाड्याने दिला असेल, तर सरकारच्या वतीने त्यांना करातून सूट देण्यात आली आहे आणि त्यांना भाड्याने मिळणार्या उत्पन्नावर आधीच सूट देण्यात आली होती. अशा परिस्थितीत, जमीनदारांना करात सूट कशी मिळते आणि जमीनदारांच्या संदर्भात टॅक्स चे काय नियम आहेत ते जाणून घ्या.
घरमालकाला सूट कशी मिळू शकेल?
घरमालकाला मिळालेल्या भाड्याच्या रकमेत इनकम टॅक्समध्ये सूट दिली जाते. खरेतर, घरमालकाला मिळालेल्या भाड्यात सरळ सूट दिली जात नाही, भाड्यातून मिळणार्या उत्पन्नामध्ये 30 टक्के सूट दिली जाते आणि उर्वरित उत्पन्न कराच्या जाळ्यात घेतले जाते. पूर्वी ही सवलत देखभाल खर्च म्हणून दिली जात होती, परंतु आता सरकारने त्याला 30 टक्के निश्चित केले आहे.
उदाहरणार्थ, समजा तुम्ही भाड्याने तुमचे घर दिले असेल आणि त्यामधून तुमचे वार्षीक उत्पन्न 6 लाख रुपये आले, तर हे संपूर्ण 6 लाख रुपये उत्पन्न मानले जाणार नाहीत. यामध्ये 30 टक्के वजा केल्यानंतर उरलेली रक्कम भाड्याने मिळणारी अंतिम उत्पन्न मानले जाईल आणि उरलेल्या रकमेवर कर मोजला जाईल. सरळ शब्दात सांगायचे तर, भाड्याच्या उत्पन्नात 30 टक्के सूट मिळाली आहे. त्याच वेळी कर्ज घेतल्यानंतर घर भाड्याने दिले गेले असेल तर त्यासाठी वेगळा नियम आहे.
याव्यतिरिक्त जे लोकं हे घराचे भाडे उत्पन्न म्हणून वापरतात आणि व्यवसाय म्हणून दर्शवितात, त्यांच्यासाठी टॅक्सचे वेगळे व्यवसायाचे नियम लागू होतात आणि त्यांच्यासाठी कर प्रणाली वेगळी असते.
भाडे नसेल तर कर नाही?
सामान्यत: घरमालकाला घर भाडे मिळाले असो वा नाही, तरी सुद्दा टॅक्स विभाग त्यांना कर लावत असे, परंतु आता जर तुम्हाला भाडे मिळाले नसेल तर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. म्हणजेच, जर मालकाला घर भाडे केवळ 8 महिन्यांसाठीच प्राप्त झाले असेल, तर केवळ याच रकमेवर कर भरावा लागेल, त्यामध्ये तुमच्या 12 महिन्यांच्या भाड्याची गणना केली जाणार नाही.