मुंबई : तुम्ही अजूनही जर ITR फाईल केला नसेल तर चूक करताय. ITR भरण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक आठवडा शिल्लक आहे. 31 जुलैआधी तुम्हाला आयटीआर भरायचा आहे. ITR भरण्यासाठी सरकारने कोणतीही सध्या मुदत वाढवली नाही. 31 आधी जर तुम्ही भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही आयकर रिटर्न भरल्यास, तुम्हाला कलम 234A आणि आयकराच्या कलम 234F अंतर्गत दंडासह करावरील व्याज भरावे लागेल. आयकर विभागाने अनेक आयटीआर फॉर्म जारी केले आहेत. यामध्ये विविध श्रेणीनुसार फॉर्म देण्यात आले आहेत. 


तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतानुसार फॉर्म निवडावा लागेल. ITR फॉर्म निवडण्यात चूक करू नका. तिथे चूक झाल्यास, तुम्हाला त्याचा मोठा तोटा होईल आणि तुम्हाला कलम १३९(५) अंतर्गत सुधारित रिटर्न भरण्यास सांगेल.


जे भरणार आहेत त्यांनी एक खातं न देता तुमच्या सगळ्या खात्यांची माहिती नीट भरणं गरजेचं आहे. करदात्याच्या नावावर नोंदणीकृत सर्व बँक खात्यांचा तपशील अनिवार्य असल्याचे आयकर नियमांमध्ये स्पष्ट आहे.


ऑनलाईन ITR कसा भरायचा? 
1. आयकर विभागाच्या वेबसाइटवर जा.
2. तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
3. तुम्ही लॉग इन केले नसेल तर  'रजिस्टर युवरसेल्फ' बटणावर क्लिक करा.
4. ई-फाइल, इन्कम टॅक्स रिटर्नवर 'फाइल इन्कम टॅक्स रिटर्न' वर क्लिक करा.
5. सर्व माहिती अपडेट करा आणि आयटी रिटर्न भरण्याचे कारण निवडा.
6. आर्थिक वर्ष निवडा.
7. एकदा सर्व माहिती तपासा.
8. सर्वकाही बरोबर असल्यास, 'प्रीव्ह्यू आणि सबमिट करा' वर क्लिक करा.
9. आता ITR अपलोड होईल आणि तुम्हाला OTP मिळेल, तो सबमिट करा.
10. आता तुम्हाला ITR फाईलचा मेसेज येईल.