ITR Refund: 31 जुलैपर्यंत आयकर रिटर्न भरण्याची लगबग सुरु होती. काही जणांनी अगदी शेवटच्या क्षणी आयकर रिटर्न भरला. त्यानंतर आता आयकर विभाग आयकर रिटर्नसाठी अर्ज केलेल्यांची छाननी करत आहे. ज्या करदात्यांचा टीडीएस कापला गेला आहे त्यांना परतावा दिला जात आहे. गेल्या काही दिवसात अनेक करदात्यांना परतावा देखील मिळाला आहे. पण काही करदात्यांना परताव्याऐवजी नोटीस मिळाली आहे. उत्पन्न आणि कराची चुकीची गणना केली जाते, तेव्हा आयकर विभाग नोटीस पाठवतं. तंत्रज्ञानाच्या युगात आयकर विभाग आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सॉफ्टवेअरद्वारे परताव्याची छाननी करत आहे. त्याआधारे करदात्यांना नोटीस दिली जात आहे. इन्कम टॅक्स कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत एकाच वेळी अनेक दावे केले असल्यास नोटीस मिळू शकते. या प्रकरणात, करदात्याला आयटीआर व्हेरिफाय आणि रिवाइज करावे लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर कायद्याच्या कलम 80G अंतर्गत विविध खर्चांवर कर सूट मिळते. या कलमांतर्गत सूट मिळण्याचा दावा करणारे छोटे व्यावसायिक किंवा करदात्यांना अधिक नोटीस मिळत आहेत. दान, धर्मादाय निधी, मदत निधी या कक्षेत येतात. अशा परिस्थितीत कर्मचारी असो की व्यापारी वर्ग, कर आणि उत्पन्नाचा हिशोब चुकला तर आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. दोषी आढळल्यास कारवाई म्हणून 200 टक्के दंड आकारला जाऊ शकतो.


नोटीस मिळाल्यावर काय करावे


जर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळाली असेल, तर सर्वप्रथम गुंतवणुकीत दाखवलेली कागदपत्रे गोळा करा. या दस्तऐवजांच्या आधारे, नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत ITR फाइलिंगमध्ये सुधारणा करा. पगारदार कर्मचारी असल्यास, फॉर्म 16 मध्ये दर्शविलेल्या कपातीशी जुळले पाहिजे. तुमच्या आयटीआरमध्ये फॉर्म 26AS मध्ये दिलेल्या सर्व कपातींचा ताळमेळ बसवा. टीडीएसची रक्कम फॉर्म 16 आणि फॉर्म 26AS मध्ये समान असावी. फॉर्ममध्ये काही फरक दिसत असल्यास, तुमच्या कंपनीला ते दुरुस्त करण्यास सांगा.