मुंबई : दिल्ली येथील अमेरिकी दूतावासात कार्यवाहक राजदूत या उच्चपदावर असणाऱ्या मॅरिके कार्लसन यांना भारताच्या स्वातंत्र्यदिनाला नेमकी साडी नेसावी हा प्रश्न पडला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अशावेळी त्यांनी सोशल मिडीयावर साडीची निवड करायला मदत करा असे आवाहन केले होते.  


या आवाहनानुसार, मॅरिके कार्लसन यांनी कांजीवरम साडी नेसावी असा नेटकर्‍यांनी मत नोंदवले. त्यानुसार मॅरिके कार्लसन यांनी कांजिवरम साडी आज नेसली होती. त्यानंतर संध्याकाळच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी टसर सिल्क साडी नेसली.  



 


भारताच्या स्वातंत्र्यदिनाला मॅरिके कार्लसन यांना साडी नेसून सहभाग घ्यायचा होता त्यासाठी त्यांनी  खादी इंडियाला भेट दिली. पण विविध नक्षीकाम आणि कापडांचे वैविध्य पाहून नेमकी कोणती साडी निवडावी याबाबत त्यांचा गोंधळ झाला होता. मॅरिके कार्लसन यांनी कांजीवरम, टसर, जामदानी आणि डुपियन या चार साड्यांची निवड केली आहे. मात्र त्यापैकी कोणती एक निवडावी हा पेच मात्र होता.