India-China Troops Clashed :  भारत-चीनच्या सीमेवर कायमच तणाव असतो. आता अशा परिस्थितीत भारत-चीन सीमेवर दोन्ही बाजूने झटापट(India-China Troops Clashed) झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यात 20 ते 30 सैनिक जखमी झाले आहेत. अरुणाचल प्रदेशजवळील(Arunachal Pradesh) सीमा रेषेजवळ हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या कमांडरमध्ये चर्चा झाल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकारावर भारताच्या अधिकृत निवेदनाची प्रतिक्षा केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सर्व प्रकार 9 डिसेंबर 2022 रोजी घडला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याचे समजते. तवांग जिल्ह्यातील यंगस्टे येथे ही झटापट झाल्याचे समजते. 
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार चार दिवसांपूर्वीची ही घटना आहे. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एलएसीपर्यंत पोहोचल्याचेही समजते.


चिनी सैनिकांच्या या कारवाईला भारतीय जवानांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीमुळे सीमेवर तणावाची स्थिती असून सैन्य दल अधिक अलर्ट झाला आहे.