नवी दिल्ली : India Covid Update: गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 8,582 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह, देशातील कोविड रुग्णांची संख्या 44,513 पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवीन रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. त्याचवेळी, एका दिवसात 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी कोरोनाचे 8,329 नवीन रुग्ण आढळले. कालच्या आकडेवारीनुसार, कोरोना प्रकरणांमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 44,513 झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. शनिवारी महाराष्ट्रात कोविडचे 2,922 नवीन रुग्ण आढळले.


दिल्लीत कोरोनाचे 795 नवीन रुग्ण 


राजधानी दिल्लीत शनिवारी कोविड-19 चे 795 नवीन रुग्ण आढळून आले आणि संसर्गाचा दर 4.11 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. माहितीनुसार, विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, यापूर्वी 13 मे रोजी दिल्लीत संसर्गाची 899 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती आणि चार लोकांचा मृत्यू झाला होता, तर संसर्ग दर 3.34 टक्के होता.


देशात कोविड रुग्णांत झपाट्याने वाढ


7 ऑगस्ट 2020 रोजी देशातील कोरोना संक्रमित लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. कोरोना विषाणू संसर्गाची एकूण प्रकरणे 16 सप्टेंबर 2020 रोजी 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी देशात कोरोना रुग्णसंख्या एक कोटींहून अधिक झाली होती. गेल्यावर्षी, 4 मे रोजी, कोरोना बाधितांची संख्या 20 दशलक्ष आणि 23 जून 2021 रोजी ती 3 कोटी पार केली होती.