Covid-19 : गेल्या २४ तासांत देशात १ हजार ५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना रुग्णांची संख्या ३३ लाखांवर पोहोचली आहे
नवी दिल्ली : देशात अनेक सक्तीचे नियम लागू केल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचं चित्र समोर आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी १ सप्टेंबरपासून देशात अनलॉक ४ सुरू होणार आहे. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं, मास्क वापरणे इत्यादी नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे.
भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ७७ हजार २६६ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३३ लाख ८७ हजार ५०१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६१ हजार ५२९ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ४२ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू असून २५ लाख ८३ हजार ९४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.