मुंबई : आतापर्यंत ४२ लाख कोरोनाबाधितांचा आकडा पार केला आहे. रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ९०,८०२ कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी सापडले असून गेल्या २४ तासात १०१६ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत ४२,०४,६१४ कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे. यामध्ये ८,८२,५४२ रुग्ण ऍक्टिव्ह असून ३२,५०,४२९ बाधितांना घरी सोडले आहे. एकूण ७१,६४२ बाधितांनी आपला जीव गमावला आहे.  



महाराष्ट्रातील मुंबईत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोनाचं संक्रमण टेन्शन वाढवणार ठरत चाललं आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाचे १९१०ऍक्टिव रुग्ण आढळले आहे. तर ३७ लोकांनी आपला जीव गमाला आहे. 


मुंबईत कोरोनाच्या संक्रमित रुग्णांचा आकडा हा १ लाख, ५५ हजार,  इतका आहे. यामध्ये २३,९३० ऍक्टिव केस आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे या शहरातील १,२३,४ लोकांनी आजारावर मात केली आहे. मात्र मुंबईत ७८६६ लोकांनी आपला जीव गमावला आहे.  



देशांत ३२.५ लाख लोकं कोरोनामुक्त झाली आहे. ६९,५६४ लोक गेल्या २४ तासांत कोरोनावर मात केली आहे. रिक्वरी रेट हा ७७.३१% इतका आहे.