मुंबई : Internet Speed News : भारताने  (India) इंटरनेटचा स्पीड वाढवण्याबाबत कमाल केली आहे. यामुळे जगाला हादरा बसला आहे. वास्तविक, भारताने स्वतःचे 4-G बनवले आहे. त्याची किंमत खूप कमी आहे, तर गुणवत्ता खूप जास्त आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की 4-G नंतर भारताचे स्वतःचे 5-G असेल. तर 6-Gच्या बाबतीत भारत आघाडीवर असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे दूरसंचार मंत्री (Telecom Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) म्हणाले की, देशातील एक लाख 2-जी टॉवर्स 4-जीमध्ये रुपांतरित केले जातील. पुढील वर्षअखेरीस हे काम पूर्ण होईल. तसेच यामध्ये भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे इंटरनेटचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याचबरोबर जूनपासून 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


वैष्णव यांनी गुरुवारी संचार भवनात पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार देशात 5G चा मार्ग सुकर करण्यासाठी वेगाने काम करत आहे. याआधी देशातील एक लाख 2-G टॉवर भारतीय तंत्रज्ञानाने 4-Gमध्ये रुपांतरित केले जातील. पुढील वर्षअखेरीस तीन टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पूर्ण झाल्यावर, इंटरनेटचा वेग वाढेल, पण 5G सेवा सुरू करण्याचा आधार बनेल.


ट्रायची शिफारस


मंत्री वैष्णव म्हणाले की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) 5G सेवा लागू करण्यासाठी सर्व तयारी करत आहे. यासाठी, TRAI ने 30 वर्षांसाठी वाटप केल्या जाणार्‍या रेडिओ लहरींसाठी अनेक बँड्समध्ये आधारभूत किंमतीवर 7.5 लाख कोटींहून अधिकची मेगा लिलाव योजना तयार केली आहे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, सरकार त्याचे पालन करत आहे. त्यासाठीची लिलाव प्रक्रिया जूनमध्ये सुरू होऊ शकते. स्पेक्ट्रमच्या किंमतीबाबत उद्योग जगतातील चिंता दूर करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे ते म्हणाले.