इन्स्टाग्राम Reel Video मुळे गाजतेय `ट्रक गर्ल`, पाहा ती आहे तरी कोण?
महिलांनी ट्रक चालवणं अद्यापही भारतात फारसं प्रचलित नाही. पण, इन्स्टाग्राममुळे देशातील अशीच एक तरुणी समोर आली आहे, जी चक्क भलामोठा ट्रक अगदी सहजपणे चालवत आहे.
Viral Video : गेल्या काही वर्षांपासून लोकप्रियतेचे निकष पूर्णपणे बदलले आहेत. म्हणजे जिथे आधी फक्त कलाकार किंवा नावाजलेल्या व्यक्तीच प्रसिद्धीझोतात असायच्या तिथे आता सर्वसामन्य चेहरेसुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळवताना दिसत आहेत. या चेहऱ्यांमध्येच आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. ही तरुणी तिच्या ट्रक (Truck) चालवण्याच्या कौशल्यामुळे चर्चेत आली आहे.
हो तुम्ही नीट वाचलंय. ती ट्रक चालवतेय, तेही अगदी बिंधास्त. इथे अनेकजणी रस्त्यावर दुचाकी (bike) चालवतानाही घाबरतात, तिथेच ही तरुणी मात्र रस्त्यावर बेधडकपणे ट्रकची स्टेअरिंग हाती घेताना दिसत आहे. ( india first truck girl Nehu thakur viral video on social media)
इन्स्टाग्रामवर रील्स (Instagram reels) शेअर करणारी ही तरुणी 'ट्रक गर्ल' (Truck Girl) म्हणून ओळखली जाते. नेहू ठाकूर असं तिचं खरं नाव. या सोशल मीडिया (Social media star) प्लॅटफॉर्मवर तिचे जवळपास 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नेहुचा युट्यूब चॅनलही (You Tube) आहे, जिथेही तिची लोकप्रियता दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
हे पाहिलं का? अरे बापरे! किचनमध्ये घुसला King Cobra, सर्पमित्रानं कसं पकडलं; पाहा Video
मुळची हिमाचल प्रदेशची (Himachal Pradesh) रहिवासी असणारी नेहु तिच्या कोणत्याही पोस्टवर सहजपणे हजारो लाईक्स मिळवून जाते. नेहुविषयी फार माहिती अद्यापही समोर येऊ शकलेली नही. पण, तिचं ट्रक चालवणं आणि आत्मविश्वासानं आपण काहीतरी भन्नाट करतोय हे नेटकऱ्यांपुढे मांडणं मात्र कमाल चर्चेत आहे हे नाकारता येणार नाही.
तुम्हीही आतापर्यंतच पाहिलेल्या अशाच सोशल मीडिया स्टार्सपैकी (Social Media star) नेहुसारखंच भन्नाट काम करणारं कुणी आहे का? कमेंटमध्ये कळवा.