Utpal Parrikar | उत्पल पर्रिकरांचा मोठा निर्णय, अपक्ष निवडणूक लढवणार
देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पणजी | गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election 2022) तयारी सुरु आहे. प्रत्येक पक्षाने निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत. दरम्यान गोव्यातून विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (india former defense minister and former goa chief minister manohar parrikar son utpal parrikar will contest independtly from Panaji assembly constituency)
उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी ही घोषणा केली. उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासमोर बाबूश मोन्सेरात यांचं आव्हान असणार आहे.
उत्पल पर्रिकर काय म्हणाले?
"पणजीतील जनतेनं मनोहर पर्रिकरांवर प्रेम केलं. माझ्याबाबत पणजीच्या जनतेला ठरवू द्या. मनोहर पर्रिकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतला आहे. मी भाजपविरोधात नाही, असं उत्पल पर्रिकर यांनी स्पष्ट केलं.
पणजीतील जनतेच्या सन्मानार्थ अपक्ष लढणार आहे. भाजपची ऑफर नाकारली, दुसऱ्या पक्षांची कशी स्वीकारणार? माझ्याकडे कोणता चॉईस नव्हता
मी कोणत्याही पोस्ट साठी लढत नाही आहे. मी पणजी साठी लढत आहे, असंही उत्पल यांनी नमूद केलं.
"भाजपा आणि अपक्ष हे दोन मार्ग माझ्याकडे होते. भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे अपक्ष अर्ज केला आहे. माझ्या भविष्याची काळजी करु नये. मला गोव्याची काळाजी आहे", असं उत्पल यांनी सागंतिलं.
"आताचे निर्णय हे पर्रिकर पक्षाचे नाव वाटत नाही. मी कुठल्याच पद आणि पोस्ट करत नाही पणजीच्या लोकांसाठी मी हे करत आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मोठा होण्यासाठी खूप काही केलं. त्यांना न्याय देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी पक्ष अर्ज करणार आहे", असंही उत्पल यांनी सांगितलं.
गोव्यात निवडणूक केव्हा?
गोव्यात एकूण 40 विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्वच्या सर्व मतदारसंघासाठी एकूण 1 टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.